बुधवार, २७ जुलै, २०१६

नातं पल्याडचं

नातं पल्याडचं

मैत्रीच्या पल्याड
एक नातं असतं !

नसता पाणी कधी
शब्दांनी चिंब करतं !

पेटवायचं नसलं तरी
स्पर्शानं केवळ चेतवतं !

मनातले भाव सुध्दा
डोळ्यांतुनच बोलतं !

दुराव्याचं असलं जरी
आपुलकीचचं असतं !

जीवंतपणी जुळलेलं
अनंतात विरणार असतं!

© शिवाजी सांगळे 🎭

दे धक्का...! कट्टी बट्टी


दे धक्का...!
कट्टी बट्टी

दोघ आम्ही तसेच हट्टी
कधी कट्टी तर कधी बट्टी,
भांडत जरी कधी असलो
तरीही आहे आमची गट्टी !

राजकारण रूपी संसारात
या कुरबुरीना वाव असतो,
जनता नामक शेजार्‍यांचा
टाईमपासही होत असतो !

© शिवाजी सांगळे🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24767/new/#new

पाऊस पाखरू


पाऊस पाखरू

लाेलक थेंब पाऊस बिलोरी
एकसुर बरसती अखंड धारा,
तांबुस हिरव्या रंगा सोबती
पाखरां हाेई तो वृक्ष सहारा !

© शिव 🎭

मंगळवार, २६ जुलै, २०१६

दे धक्का...! याड लागलं

दे धक्का...!
याड लागलं

ज्याला बघावं तो हल्ली
पाेकेमाँनला शोधतो आहे,
याडा मुळं प्रत्येक जण
जीवावर उदार होत आहे!

येवढं हे याड तूम्ही
अभ्यास न् कामाला लावा,
रिजल्ट बघा मिळेल
तूम्हाला पाहिजे तो हवा?

© शिवाजी सांगळे🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24759/new/#new

शनिवार, २३ जुलै, २०१६

जलसा

जलसा

पाऊस पडून गेल्यावर
रानात आज जलसा होता,
रातकिड्याच्या गाण्या संगे
काजव्यांचा नाच होता !

© शिव 🎭

मन भरेना

मन भरेना

फुल गंध थांबेना, वारा तरी मानेना
रानफुलां का सांगा, मन तरी भरेना।

© शिव 🎭

सळसळ

सळसळ

रानात आता, घुमतोय पारवा
पाना पानात, सळसळ गारवा।

© शिव 🎭

सारथी


सुर सुगंध


दे धक्का...! हेल्मेट - हेल्मेट

दे धक्का...!
हेल्मेट - हेल्मेट

हेल्मेटची सक्ती अाणि विरोध
असं तर सुरूच राहणार,
सुप्रीम कोर्टाचा आदेश सर्वांना
मान्य करावाच लागणार !

हेल्मेट शिवाय पेट्रोल नाही
हा तर चांगलाच पायंडा पडेल,
नाहीच जर हेल्मेट घातलं
तर दुचाकी पंपा बाहेरच अडेल !

© शिवाजी सांगळे🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24727/new/#new