बुधवार, २६ एप्रिल, २०१७

नेम

नेम

नेत्रात पाडसाच्या व्याकूळ भाव होते
शोधात पारधी तो ठेऊन नेम होता

=शिव
119/26-04-2017

स्वर

स्वर

स्वरात बासरीच्या आर्तच अर्थ होता
गालात हासतांना डोळ्यात थेंब होता

=शिव
118/26-04-2017

मंगळवार, २५ एप्रिल, २०१७

पहाटे पहाटे

पहाटे पहाटे

दरवळ प्राजक्ताचा सुटता पहाटे पहाटे
दंगलो स्वप्नात तुझ्याच मी पहाटे पहाटे

हलकेच चाहुलीने जाग आली मला ती
हरवूनी स्वतःत मीच गेलो पहाटे पहाटे

समजावु काय कसे या बावर्‍या मनाला
सजलेत नेत्री भास पारदर्शि पहाटे पहाटे

वाजतात पैंजन तरंग तरीही भोवताली
वार्‍यावर तुषार नृत्य संतूरी पहाटे पहाटे

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t28349/new/#new

सोमवार, २४ एप्रिल, २०१७

मंडप आठवांचे

मंडप आठवांचे

मंडप आठवांचे निघाले साठवीत नयनी
चालले सोडून बघ सखे घर प्रियजनांचे

=शिव
117/24-04-2017

शनिवार, २२ एप्रिल, २०१७

पण काहीही म्हणा... दिव्याची वृत्ती


पण काहीही म्हणा...
दिव्याची वृत्ती

लाल दिवा आता तर गेला
पण मग्रुरी कधी जाणार?
सत्तर वर्षे मनात रूजलेली
मानसिकता कशी बदलणार?

व्हीआयपी कल्चर तेव्हां तर
ब्रिटीशांनी काटेकोर पाळलं,
त्यांच्या मागे सत्ताधार्‍यांनी
इतका काळ इमाने सांभाळलं!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t28296/new/#new

पण काहीही म्हणा... तप्त नागपूर


पण काहीही म्हणा...
तप्त नागपूर

माणसाची माणुसकी हरवली
कि स्वार्थी हवस वाढली आहे?
आधुनिकतेच्या काळात अश्या
अमानुष घटना का घडत आहे?

आमदार निवासात बलात्कार
न् जंगलात वणवा पेटला आहे,
पारदर्शि सरकारच्या काळात
खरचं नागपूरही तापलं आहे !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t28291/new/#new

शुक्रवार, २१ एप्रिल, २०१७

भीती

भीती
मनातुन वाटतं काहिंना
कुणी घ्याव आपल्याला कडेवर,
भीती पण वाटते त्यांना
काय होईल खाली पडल्यावर?
=शिव
21-04-2017

सीख

सीख

इश्क इबादत और
इबादत ही इश्क है,
तु मान, या ना मान
बंदे, यही तो सीख है !

=शिव
17/21-04-2017

गुरुवार, २० एप्रिल, २०१७

प्रवास

प्रवास

मातीतच जन्म आणि अंत
बाकि प्रवास जगण्याचा,
माती पर्यंत जाणारा...
तूमचा आमचा सर्वांचा...

=शिव
380/20-04-2017

चांदोमामा

चांदोमामा

चांदोमामा चांदोमामा थकलास का?
टाॅवरच्या मागे लपलास का?

टाॅवर आता झाला गगनचुंबी
नात्यात पण वाढली बघ लांबी

एकदवेळी अंगणात येउन जा
कधीतरी आमच्याशी खेळून जा
=शिव