सोमवार, १३ नोव्हेंबर, २०१७

आयुष्य

आयुष्य

प्रेमात झोकलेलं
आहे आयुष्य
त्यागाने व्यापलेलं
आहे आयुष्य
न उलगडलेलं कोडं
आहे आयुष्य
जगणं समजलं तर,
सोप आहे आयुष्य
नसमजता जगलो तर,
कठीण आहे आयुष्य
समजून बिघडवलेलं
गणित आहे आयुष्य

©शिवाजी सांगळे 🦋
12-11-2017

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०१७

हायकू २१४-२१६

#हायकू २१६
बोचरा वारा
पहाट खेळ सारा
अंगी शहारा १०-११-२०१७

#हायकू २१५
रौद्र थैमान
तरंगते जहाज
दोलायमान ०९-११-२०१७

#हायकू २१४
ऋतूचे रंग
हवेत ये तरंग
मन हो दंग ०८-११-२०१७
©शिव

डोळ्यात तुझ्या

http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t29819/new/#new


गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०१७

मैत्री

मैत्री
मैत्रीत कधी साँरी थँक्स
मुद्दामहून आणू नये,
मोकळेपणाने बोलताना
औपचारिकता पाळू नये !

#शिव©
430/08-11-2017

मौन

मौन
मौनाची बोलकी भाषा
जागवी मनात आशा,
कधी उत्साही आनंद
कधी अबोल निराशा !
#शिव
 429/03-11-2017

हायकू २११-२१३

#हायकू २१३
धुके दाटले
चमके दव बिंदू
एक लोलक
#शिव ०७-११-२०१७

#हायकू २१२
ऋतू गारसा
कवडसा उन्हाचा
हवा हवासा ०६-११-२०१७

#हायकू २११



सोमवार, ६ नोव्हेंबर, २०१७

हायकू २०८-२१०

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू २१०


#हायकू २०९


#हायकू २०८



गुरुवार, २ नोव्हेंबर, २०१७

शहर

शहर

http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t29768/new/#new

हायकू २०५-२०७

#हायकू २०७
आल्हाद गंध
दे सुवर्णचंपक
मन प्रसन्न ०१-११-२०१७

#हायकू २०६
दव पहाट
पाखरांचा रियाज
किलबिलाट ३१-१०-२०१७

#हायकू २०५
वाऱ्याचे येणे
हळूवार स्पर्शने
सुरेल गाणे २९-१०-२०१७

रविवार, २९ ऑक्टोबर, २०१७

हायकू २०२-२०४

#हायकू २०४
छायाचित्र सौजन्य: गुगल


#हायकू २०३
माणिक मोती
देणं हे निसर्गाचं
दव बिंदूचं २६-१०-२०१७

#हायकू २०२
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर