सोमवार, ४ जून, २०१८

खरे खोटे

खरे खोटे

सोसले दु:ख छोटे होते
भेटले सर्व खोटे होते

थोक खरेदी करण्या गेलो
विक्रीस तेथे वाटे होते

करू म्हणताच एकत्र चर्चा
फुटले तिजला फाटे होते 

म्हटल शिकावं चोरी करणं
त्यातही फार तोटे होते

उरकण्या काम ते सरकारी
घातले खूप खेटे होते 
(मात्रा वृत्त : पादाकुलक ८+८)
© शिवाजी सांगळे 🎭
 संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t30889/new/#new

वेळ

वेळ
"भासा भासाचा खेळ" हा
आत्म्या परमात्म्याचा मेळ
जाणतो ते रूप परमेशाचे
शोधण्यास दवडतो वेळ !
४७२/०२०६२०१८

शुक्रवार, १ जून, २०१८

भुल


४७१/३१०५२०१८
चित्र सौजन्य : गुगल

शिडकावा

शिडकावा
तुझ्या रे शिडकाव्याने 
काल भलताच घोळ केला,
बेसावध मी असताना
तीच्या संगतीचा भास झाला !
४७०/२९०५२०१८

हायकू ३२४-३२६

#हायकू ३२६

छायाचित्र सौजन्य: श्री मनोज बिंड

#हायकू ३२५

छायाचित्र सौजन्य: श्री मनोज बिंड

#हायकू ३२४

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

रविवार, २७ मे, २०१८

हायकू ३२१-३२३

#हायकू ३२३

छायाचित्र सौजन्य: वॉट्स अँप

#हायकू ३२२

छायाचित्र सौजन्य: श्री शिवाजी सांगळे

#हायकू ३२१

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

शनिवार, २६ मे, २०१८

दिवारें



जॉन

जॉन

डोक्यावर अस्ताव्यस्त वाढलेले केस, बाकी शरीर पुर्णपणे उघडं आणि लाज झाकण्यासाठी सुतळीच्या तुकड्यांनी कमरेला आवळलेली रंगहीन कळकट, मळकट पँन्ट, दोन्ही हातांच्या बोटांनी कसली तरी आकडेमोड करतोय अशा हालचालींसह अस्पष्ट, अतर्क्य बडबड करीत, मात्र रस्त्याच्या कडेने आपल्याच तंद्रीत झपाट्याने चालणारा, कधीकधी कचराकुंडी जवळ घुटमळत, काही बाही चीज उचलणारा 'जॉन' बरेच दिवस दिसला नाही...

तो कुठला? त्याचं खरं नाव काय? कुणालाच माहीत नव्हतं, तब्येतीने तसा तो उंचापुरा, भक्कम म्हणून कुणीतरी जॉन हाक दिली, तो पण मागे वळला... तेच त्याचं बारसं, लोक काहीतरी शिळंपाकं देण्यासाठी, तर कधी मुलं चिडवण्यासाठी, उगाच त्याला याच नावानं हाका मारायची. तो सुद्धा वळून पहायचा, कधी थांबायचा, पुढे केलेली वस्तू जवळ येऊन निमुटपणे घेऊन पहायचा, आवडली तर खायचा, नाही तर... शाहणी माणसं करणार नाहीत असं करायचा, 'ती वस्तू जवळच्या कचराकुंडीत अलगद सोडायचा'.

कधीकधी मनात विचार येतो, याचं पण कुणी तरी सख्खं असेल ना? कुठे असतील ते? त्यांना याची व याला त्यांची आठवण येत असेल का? असले ना ना प्रश्न मनात येतात आणि मन स्वतःलाच विचारू लागतं "तु सर्वांचा आहेस म्हणवतोस, पण ते मानतात का तसं? किंवा ते तसं म्हणत असतील तर, तु मानतोस का तसं?" काहीच उत्तर मिळत नाही याचं, पण कदाचित जॉनला याचं उत्तर सापडलयं! म्हणूनच का तो निर्धास्त हिंडत फिरत असतो, कुठेही आडोशाला झोपतो, जे मिळेल ते खातो? काय असावं बरं कारण?
जाणीवेच्या पल्याड गेलाय का तो?

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t30866/new/#new