गुरुवार, ८ डिसेंबर, २०१६

पोरका

पोरका

अंधाराचा मी, इतका लाडका झालो,
सावलीस माझ्या, मीच पोरका झालो !

©शिव

संसार


रिक्तता

रिक्तता

सांज का रिती एकाकी
आठवणी सोडून आली,
सोबती कुणीच नाही
बंध सारे तोडून आली !

आज ना तरळले अश्रु
ओलावले नाहीच डोळे,
स्वप्ने थिजवुन पापणीत
अंधारात उघडेच डोळे !

मन ठाव कसा लागावा
रिक्त अंधार पोकळीला,
आलेच भरून नभ जरी
रिक्तता उरे आभाळाला !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t26438/new/#new

बुधवार, ७ डिसेंबर, २०१६

वापसी की राह से...


पाती


वळण वाट

वळण वाट

प्रवास कुणाचा कुठवर
कोणास का ठावूक आहे?
प्रवास हा पाऊल वाटेचा
जसा शहरा पर्यंत आहे !

शोधते कोणास हि वाट?
परिचित कुणी दिसते आहे?
वळणावरून जे वळून गेले
परत का ते वळणार आहे?

सुख दुःखे, अशीच वळणे,
कोण त्यां चुकविणार आहे?
नाते पाऊल वाटेचे शहराशी
वळणां सह जुळणार आहे !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/gambhir-kavita/t26432/new/#new

रविवार, ४ डिसेंबर, २०१६

कंदिल


कंदिल

लाईट नसलेल्या गावात...
गुरं परतीच्या सांजेला
नाजुक कापर्‍या हाताने
फुई आजी राखेने
लख्ख काच पुसायची
कंदिल प्रकाशात पार
उजळून जायची पडवी
गुरांच्या स्वासांचा...,
घंटाचा नाद घुमु लागे...
तोवर कुणी घोंगडी अंथरे,
मधोमध कंदिल
आजीेच्या पुढ्यात हरीपाठ
कोंडाळ करून आम्ही मुलं,
"देवाचीये द्वारी..." पासुन
"आरती ज्ञानराजा..." पर्यंत
गोड समाधी, भारणारी
शेवट... साखर शेंगदाण्याचा
मिठाई पेक्षा, गोड प्रसाद
आता विज आली अन्
हरीपाठ... हरवला...
आजी संगे...हरवला,
कंदिल आठवणीतला!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t26384/new/#new