घेऊ पाहून
तोलतो मला, जो तो आपल्याच नजरेच्या तराजू मधून
नको घाई मित्रानों एवढी जागी माझ्या पहा उभे राहून
सोसले अन् घाव झेलले, अगणित सोनवर्खी हत्यारांचे
उभा राहिलो सामोर तरीही प्रत्येकाच्या मोकळे हासून
चालायचेच खेळ असे प्राक्तनाचे जुने अन् नवीन सुद्धा
रंग खरे खेळण्यात त्या आपले प्रत्येकाने दिले दाखवून
गोठले, आटले बर्फ जे आत आत धुमसत्या भावनांचे
ठेवले आक्रंदत त्यांना मी कसोटीवर काळाच्या बांधून
टळते वेळ, सरते वेळ घेऊन प्रत्येक वेळी एक हुशारी
होणारे ते होऊन जाईल, त्या त्या वेळी ते घेऊ पाहून
https://marathikavita.co.in/index.php?topic=45256.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा