मंगळवार, ३१ जानेवारी, २०१७

तळ

तळ

मनाचा तळ न सापडणारा
मारून डुबकी न दिसणारा
शोधूनही शिल्लक उरणारा
अखंड शून्यात  फिरणारा !

=शिव

सोमवार, ३० जानेवारी, २०१७

चिरतरून

चिरतरून

सुन्या वाटेला प्रतिक्षा ही कशाची?
शोध रे मना तूच तूझ्या वळणाची!

सारेच व्यर्थ आभास भोग लालसेचे
तोडण्या धजावे शृंखला परीक्रमेची!

देह जळीदार झाला पुराना आता
चिरतरून मनास आस रे कशाची?

आसमंती एक ठिपका प्रतिक्षेतला
पाहतोय वाट तेथवर पोहचण्याची!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t27120/new/#new

रविवार, २९ जानेवारी, २०१७

पण काहीही म्हणा... चि आणि चि


पण काहीही म्हणा...
चि आणि चि

स्पर्धा जोरात सुरू आहे
चिखलफेक, चिमट्यांची,
उणेदुणे काढता काढता
पुराणातील दाखल्यांची !

जनता बिचारी जागेवर
तीचं कोण पाहतो भले?
स्वतःचंच भलं पाहताना
दोघंही परस्पर विसरले !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t27110/new/#new

गुरुवार, २६ जानेवारी, २०१७

सोहळे

सोहळे

झेंडेही आजवर खुप मिरवीले
रंगात वेग वेगळ्या रंगविलेले !

गप्पा विषमतेच्या केल्या चविने
नाही शोधण्या कधी डोकावले !

असहाय्य आम्ही नेत्रांत जनांच्या
स्वप्निल रंगच आजवर सजविले !

सोहळे स्वातंत्र्य, प्रजासत्ताकाचे
नित्य नेमाने पहा आम्ही घातले !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/vidamban-kavita/t27076/new/#new

बुधवार, २५ जानेवारी, २०१७

पण काहीही म्हणा... देशभक्ती


पण काहीही म्हणा...
देशभक्ती

सिझनल देभक्तीला
नेमका आता उत येईल,
मीच कसा देशभक्त
जो तो दाखवुनच देईल !

कीवं येते तिरंग्याला
यांची देशभक्ती पाहून,
सहा महिन्यां साठी
जातो पुन्हा हिरमुसुन !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t27065/new/#new

किंमत

किंमत

आकड्यांसी कसे कळावे
नाजुक भाव शब्दां मधले?
सोसतात दु:ख वेळोवेळी
हृदयात असते जे दडलेले!

शुन्याला म्हणे किंमत येथे
दाखवू कसे मन भारलेले?
एक ते नऊ मार्गस्थ सारे
लक्ष विचार मनी दाटलेले!

मोजु पाहतो संख्येत शब्दांं
दौडतात जणु अश्व उधळले,
थोपवुन घ्यावे म्हणता कधी
सुप्त होती जसे दवं गोठले !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t27063/new/#new

मंगळवार, २४ जानेवारी, २०१७

पण काहीही म्हणा... सत्तेचे पाणी


पण काहीही म्हणा...
सत्तेचे पाणी

ईनकमिंग आऊटगोईंग
आधी मोबाईल पुरतं होतं,
निवडणुका आल्यावर
तीथंही याला पेव फुटतं !

पक्ष निष्ठा, प्रामाणिकता
अशावेळी नक्की जाते कुठे?
समाज सेवेचे व्रत म्हणावे
कि तोंडी सत्तेचे पाणी सुटे?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t27045/new/#new

रविवार, २२ जानेवारी, २०१७

मी ट्याँग कर, ट्याँग कर

वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा

मी डोलकर डोलकर, डोलकर दर्याचा राजा घर पान्यावरी बंदराला करतो ये जा!
च्या चालीवर....
(गीतकार शांता शेळके यांची क्षमा मागुन)

ट्याँगलो रे ट्याँगलो रे, बघ कि जरा तू मित्रा

मी ट्याँग कर, ट्याँग कर
ट्याँग कर, फेसबुकचा हाय चाप्टरं
पक्का नेटकरी, करतोय फेसबुकच्या वार्‍या

सर्वांचा लाडका समजतो स्वःताला भारी
लिहून कायपणबी मारतोय तुमच्या शीरी
माझ्या डोक्यान रे आहेत खुपच आयड्या
टाकता फेसबुकवर पडत्यात लगीच उड्या
मित्र नेटवर खोेर्‍यावानी
वाचत्यात आवडीनं गाणी
फेसबुकची हाये कहाणी
रोज तूमच्या पण वारतील बघा कि फेर्‍या

या गो फेसबुकचा, फेसबुकचा पसारा मोठा
कवा वाँलवरशी देतो मालपण खोटा
कवा देताव वादाचे विषय सोरू
कवा टेंन्शनची कमेंट देताे मारू
लाईक पाहून मना ये भरती
बसतो विश्वास त्यांच्या‌ वरती
उरतं मनविमान सोडून धरती
करत्यात वाँलवरती कमेंट पोरी सार्‍या

भल्या सकाळीच मोबाईल घेतोय हाती
पोस्ट आपल्या अपाँप टाकल्या जाती
न् मी लिवत बगा सुटतोय किती
दुकती बोट पण लिवून जास्ती
डोळे बी बघुन दमुन जाती
लिवायचं लिवुन लिवुन किती
तरी पण फारच मजा कि येती
देतो वाचाया नविन गोस्टी मी सार्‍या

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/vidamban-kavita/t27014/new/#new

शुक्रवार, २० जानेवारी, २०१७

काळ+वीट


काळ+वीट

खूप झालं
वीट आला
त्रासुन आता
म्हणाले काळवीट !

चर्चा माझी
चोथा झाली
लोकात अाता
बोलले काळवीट !

थकून गेलो
मरून आता
जगुद्या एकदा
उद्गारले काळवीट !

मानवा जगती
न्यायच वेगळा
आम्हा जनावरां
तक्रारले काळवीट !

परतुनी जन्म
व्हावा एकदा
स्वशिकारी साठी
तडफडले काळवीट !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/vidamban-kavita/t26994/new/#new

बुधवार, १८ जानेवारी, २०१७

दाह

दाह...

दाह चांदण्यांचा
साहवेना देहास आता,
परतुनी साजना
रे त्वरीत येशील आता!

=शिव