शनिवार, १८ मे, २०२४

रेघोट्यांचा देह

रेघोट्यांचा देह

निश्चल या मन डोहात हे तरंग कसले उठती
अज्ञात गूढ पाताळी कधी उंच नभात जाती

पदन्यास आतुर दिसता नाचरी प्रकाश नक्षी 
तीरावरती सहज याच्या हिरवे कोंब डवरती 

सोडू पाहता पाश मातीचे देही या भिनलेले
नकळत का मुळे देहाची खोल आत रुजती

आक्रसल्या नेत्रांना हल्ली, सारे स्पष्ट दिसते
वाहूनही साचले पाणी, फिरून ते डबडबती

कुठवर आता सांभाळावा देह हा रेघोट्यांनी
धूसर आकाश पक्षी अवघे जाळे विणून देती

https://marathikavita.co.in/index.php?topic=45259.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा