सोमवार, ३१ डिसेंबर, २०१८

रक्तिमा


छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

वहिवाट

वहिवाट

वाट्यास आलेला । क्षण रम्य व्हावा ।
जन्म तो सरावा । सेवेसाठी ।।

सामोरी जो येता । क्षण ते मोहाचे । 
भान हो जनाचे । मनी राहो ।।

विसरूनी सेवा । जनहिता वेळी ।
आपुलीच पोळी । भाजू नये ।।

अवलंबू नये । स्वार्थ लोभ नीती । 
विस्कटून नाती । इहलोकी ।।

काळाचीच रीत । व्यवहारी भ्रष्ट । 
अंती करी नष्ट । ध्यानी असो ।।

कोण नित्य येथे । थांबावया आले ।
जाणे ठरलेले । माघारीचे ।।

ऐसी वहिवाट । आहे या युगाची । 
हाक वास्तवाची । ऐक शिवा ।।

© शिवाजी सांगळे 🎭
मो. ९५४५९७६५८९

http://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita/t31465/new/#new

रविवार, ३० डिसेंबर, २०१८

हायकू ३९०-३९२

#हायकू ३९२
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू ३९१
रावे उडती
झाली पानगळती
हिरवीगार २९-१२-२०१८

#हायकू ३९०
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

फर


५२०/३०१२२०१८
छायाचित्र सौजन्य:गुगल सर्च

शनिवार, २२ डिसेंबर, २०१८

हायकू ३८७-३८९

#हायकू ३८९

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू ३८८
गार गारठा
अंगावरी शहारा
चिंधी सदरा १८-१२-२०१८

#हायकू ३८७

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

शुक्रवार, २१ डिसेंबर, २०१८

ख्वाब

सपने हो चाहे ख्वाब हो
कुछ ना कुछ सिखाते है,
हुई गलतियाँ सुधार कर
भविष्य को आकार देते है !
~शिव
27/21-12-2018

प्रेरणा

तुझी माझी कविता
मांडते शब्दांत भावना,
थकलेल्या मनाला
देते जगण्याची प्रेरणा !
~शिव
५१८/२११२२०१८