गुरुवार, २२ सप्टेंबर, २०१६
दे धक्का...! औकात
बुधवार, २१ सप्टेंबर, २०१६
दे धक्का...! उर बडवे
दे धक्का...!
उर बडवे
कित्तेक आजवर शहीद झाले
तेंव्हा न आला कधी भरून उर?
मरता कधी एखाद आतंकवादी
लागतात येथले बडवायला उर !
बुध्दिजीवी हाे तोंडास तूमच्या
का लावला आता तूम्ही टाळा?
आतंकवाद्यांनी आणला जेंव्हा
काश्मिरीं लोकांच्या पोटी गोळा!
© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25479/new/#new
सोमवार, १९ सप्टेंबर, २०१६
दे धक्का...! तू रे माणसा
दे धक्का...!
तू रे माणसा
चमत्कारा असतो नमस्कार
खुर्चीची असते माया सारी,
कुणीही असो मग खुर्चीमधे
खुर्चीमागे दौड लागते दारी !
उगवत्या असे इथे नमस्कार
मावळत्या मग कोण विचारी?
असता सत्ताधिकारी माणसा
मनास प्रश्न तु, का न विचारी !
© शिवाजी सांगळे🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25468/new/#new
शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०१६
दे धक्का...! नंबर दोन
दे धक्का...!
नंबर दोन
उपराजधानीतच आताशा
गुन्हेगारी फार वाढत आहे,
पोलिसांवर हल्ले करणारे
जेलमधुन पसार होत आहे !
या स्पर्धेत सुध्दा आता
राज्य अग्रेसर होत आहे,
एनसीआरबी मता नुसार*
यु.पी. नंतर महाराष्ट्र आहे!
*नँशनल क्राईम रेकाँर्ड ब्युरो
© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25436/new/#new
गुरुवार, १५ सप्टेंबर, २०१६
जगण्याचा फंडा
जगण्याचा फंडा
काही हसून बोलायचं
काही बोलून हसायचं
जीवन असचं आहे
हसता हसता रडायचं
न् रडतांना हसायचं...!
जगण्याचे कष्ट तर
सगळ्यांनाच आहेत,
मित्रा, कष्टाला डिवचुन
मजेत हसत खेळायचं...!
जोकरला विचारून बघ
असं कस जमवायचं?
दुःखात सुध्दा हसायचं
हसता हसता रडायचं...!
हसुन नाही जमल
तर रूसुन बोलायचं
आपल्या लोकांचे
अश्रु पुसत बोलायचं...!
जगण्याचा फंडा
तसा सोपा आहे यार
दुसर्यांच्या मनात
घर करून रहायचं...!
© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/preranadai-kavita/t25408/new/#new
काही हसून बोलायचं
काही बोलून हसायचं
जीवन असचं आहे
हसता हसता रडायचं
न् रडतांना हसायचं...!
जगण्याचे कष्ट तर
सगळ्यांनाच आहेत,
मित्रा, कष्टाला डिवचुन
मजेत हसत खेळायचं...!
जोकरला विचारून बघ
असं कस जमवायचं?
दुःखात सुध्दा हसायचं
हसता हसता रडायचं...!
हसुन नाही जमल
तर रूसुन बोलायचं
आपल्या लोकांचे
अश्रु पुसत बोलायचं...!
जगण्याचा फंडा
तसा सोपा आहे यार
दुसर्यांच्या मनात
घर करून रहायचं...!
© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/preranadai-kavita/t25408/new/#new
दे धक्का...! "अच्छे दिन"ची हड्डी
दे धक्का...!
"अच्छे दिन"ची हड्डी
"अच्छे दिन" चा नारा म्हणे
सर्वात आधी काँग्रेसने दिला,
आम्ही केवळ घोषणा देताच
हड्डीचा घास गळयात गुंतला!
अतृप्त आत्म्यांच्या या देशात
"अच्छे दिन" कधी येणार?
कायम प्रश्न घेवुन मनात हा
गडकरी आता कुठे फिरणार?
© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-'-'-25421/new/#new
बुधवार, १४ सप्टेंबर, २०१६
टूर टु ग्वालियर...एक प्रवास
टूर टु ग्वालियर...एक प्रवास
!! गणपती बप्पा मोरया !!
© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t25418/new/#new
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1091497450904906&id=100001339833771
!! गणपती बप्पा मोरया !!
तीस वर्षात प्रथमच गणपती उत्सवात काहि विशेष निमित्ताने ग्वालियर (म.प्र.) येथे सासुरवाडीला येण्याचा योग आला, ज्या कामासाठी आलो ते काम सुखकर्ता दु:ख हर्ता गणपती बाप्पा सुखरूप पार पाडील अशी आशा करतो.
ग्वालियर, (म.प्र.) येथे खास करून सर्वच मराठी कुटुंबात पुणेरी विशेषत: पेशवे परंपरेचा पगडा जाणवतो, तस तर या शहराला एैतिहासिक संदर्भ व परंपरा आहेतच. लहान लहान रस्ते, गल्ल्या असलेल्या शहरात प्रत्येक नाक्यावर, गल्लीच्या कोपर्यांवर शक्तीदेवता हनुमानाची मंदिरेे जागोजगी दिसतात, या व्यतिरिक्त इतर अन्य देव देवतांची सुध्दा खुप मंदिरे आहेत, त्यामुळे इथे सतत उत्सवाचे वातावरण असते.
इथल्या मराठी लोकांमध्ये सण उत्सव साजरे करण्यात व विशेष करून खाद्द संस्कृतीत पुणेरी प्रभाव जास्त जाणवतो. ऐतिहासिक वारसा असलेलं शहर असल्यामुळे आजही येथे जुन्या परंपराची जपणुक केली जात आहे, पिढी बदलानुसार आधुनिकते कडे झुकत चाललेलं शहर अशी ओळख होवु लागली आहे. नविन नविन गृह प्रकल्प येवु लागल्या मुळे शहरात आता मल्टीस्टोरेज ईमारतींचे निर्माण होत असल्यामुळे एक नवेच वेगळे रूप शहर घेवु लागले आहे. इथे प्रत्येक घरात गणपतीची स्थापना केली जाते, या सोबत अचलेश्वर नामक प्रसिध्द विभागात एका पुरातन स्वयंभु शिवमंदिरा समोर गेल्या पन्नास एक वर्षाची परंपरा असलेल्या गणेश मंडळाकडून सार्वजनिक गणपती उत्सव साजरा करण्याची परंपरा या शहरात सुरू केली असे चौकशीत समजले.
गणपती उत्सवानंतर इथे दुर्गा उत्सव व दिवाळी फार जोरदार साजरी केली जाते, या व्यतिरिक्त वेगवेगळ्या अठरापगड सामजाच्या अनेकविध परंपरेनुसार साजरे केले जाणारे बरेच सण, उत्सव वर्षभर सुरू असतात. बाकि व्यापारी वर्ग फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे फार मोठी उलाढाल येथे चालते. इतर शहरांप्रमाणे इथे सुध्दा शहराचा विस्तार होउ लागलाय, जुने व नवे असे दोन भाग स्पष्ट दिसतात. एकंदरीत एकदातरी भेट देण्याजोगे शहर आहे, आजुबाजुला फारच सुंदर ऐतिहासिक परंपराची अन्य शहरे आहेत जसे शिवपुरी, मथुरा, आग्रा, खजुराहो वगैरे. बर्याच वर्षां पासुन या शहराबद्ल काहितरी लिहावं असं मनात होतं तो योग आता आला एवढंच.
खरं तर इथे आलो होतो ते काही वेगळ्याच कामासाठी, परंतु ते कार्य परमेश्वर कृपेने व्यवस्थित पार पडले. या प्रकारे प्रवास
वर्णनात्मक लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे, कही चुकलं असेल तर सर्व वाचक सहकारी सांभाळुन घेतील हि अपेक्षा.
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t25418/new/#new
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1091497450904906&id=100001339833771
दे धक्का...! काळाचे बाबा
दे धक्का...!
काळाचे बाबा
कित्येक काळा पासुन हे बाबा
नेहमी प्रचारात सांगत असतात,
परदेशी मालास टक्कर देत
स्वदेशीचा जम बसवु पाहतात !
योगा सह उपभोगाची साधने
बाबा आता निर्माण करू लागले,
खान्यापिण्याच्या वस्तुं सोबत
हल्ली कपडे सुध्दा शिवू लागले !
© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25403/new/#new
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)