शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०१६

पण काहीही म्हणा... रोप वे ची शक्कल


पण काहीही म्हणा...
रोप वे ची शक्कल

मेट्रो झाली नंतर मोनो झाली
एसी लोकलचीही चाचणी झाली,
गर्दी कमी करण्या साठी आता
रोप वे ची शक्कल कशी लढवली?

खरा प्रश्न गर्दीचा वेगळाच आहे
एकाच दिशेला सार्‍यांचा फ्लो आहे,
कार्यालयांचे विकेंद्रींकरण व्हावे
यावर हाच एकमेव तोडगा आहे !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t25653/new/#new

गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०१६

देह

!! देह !!

सुख दु:खा साठी, देह हो कारण !
पाप पुण्य ध्यान, मनातले !!

देह हा नश्वर, विकारांचे घर !
किती अवडंबर, करायाचे?

शुध्द देहा जोड, सात्विक विचार !
होई जो आधार, ध्याना सवे !!

देह शुध्दी मात्रे, सुचिर्भुत र्‍हावे !
मनी दृढ व्हावे, म्हणे शिवा !!

 © शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita/!!-!!-25638/new/#new

बुधवार, ५ ऑक्टोबर, २०१६

पण काहीही म्हणा... विरोधासाठी विरोध


पण काहीही म्हणा...
विरोधासाठी विरोध

कबूल  करतो  झालेले  हल्ले
तर पाकिस्तान नक्की फसतो,
तरी भारतीय सैन्याच्या कृतीवर
विरोधकांचा विश्वास का नसतो?

अविश्वास दाखवून घरचेच लोक
आता हल्ल्याचे पुरावे मागू लागले,
कायम चर्चेत राहण्या साठी का!
विरोधासाठी विरोध करू लागले?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t25626/new/#new

मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०१६

पण काहीही म्हणा... दुवा


पण काहीही म्हणा...
दुवा

प्रवासी सवलती जाहिर
करायच्या राज्य सरकारने,
न् आर्थिक घट सोसायची
मात्र एसटी महामंडळाने ?

सामान्यांचा हा लाल डबा
रस्त्यांवर धावायलाच हवा,
गाव शहरे जोडणारा दुवा
कसाही टिकायलाच हवा !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t25615/new/#new

पण काहीही म्हणा... उत्तर आणि खेळी


पण काहीही म्हणा...
उत्तर आणि खेळी 

आतंकवादाला तर आता
चोख उत्तर दिलेलेच आहे,
येवढ्यातच हे सारे संपेल?
हा विचार करणे गैर आहे !

शत्रू कोणती खेळी करील?
याचा काहिही भरोसा नाही,
हुरळून जात बेसावध राहणे
आपणासही परवडणारे नाही !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t25577/new/#new

शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०१६

पण काहीही म्हणा... प्रीपेड जेल वारी

पण काहीही म्हणा...
प्रीपेड जेल वारी

कुतुहल न् धाडसापोटी माणुस
माहित नाही काय करील?
पाचशे रूपये भरून हौसेने
मस्त टुरीस्ट जेलमधे जाईल !

मध्यवर्ती कारागृहाचेे संग्रहालय
संगरेड्डी जिल्हयात झाले,
पैसे भरून टुरीस्ट बघा आता
जेलची हवा खावु लागले !

© शिवाजी सांगळे 🎭

तेलंगणा सरकारने मेडक येथील संगरेड्डी जिल्हयाच्या मध्यवर्ती कारागृहाचे संग्रहालयात रूपांतर करून "फील दी जेल"ची अभिनव संकल्पना सुरू केली आहे.

http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t25569/new/#new

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०१६

पण काहीही म्हणा... वायफाय कटींग


पण काहीही म्हणा...
वायफाय कटींग

जमाना पुरता हल्लीचा
इंटरनेटमय झाला आहे,
कुठे माँल न् स्टेशनवर
वायफायचा ताल आहे !

सत्कार चहावाल्यानं यात
चांगलच डोकं लढवलं,
चहासंगे वायफाय देतांना
शेगावचं नावही वाढवलं!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t25560/new/#new

मंगळवार, २७ सप्टेंबर, २०१६

शृंगार आसवांचा

शृंगार आसवांचा

डोळ्यात ओल्या आसवांचा
शृंगार पाहिला मी
ओठातच दाबल्या वेदनेचा
हुंदका ऐकला मी

मरता रोज तो जीव एक
श्वासात जो गुंतलेला
एकांती निश्वास घेत
पहुडलेला पाहीला मी

उसवल्या ओठाच्या किनारी
लेप लाळेचा दाटलेला
घाव जिरलेल्या जखमेचा
शरीरावर पाहिला मी

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t25559/new/#new

शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६

पायऱ्या

पायऱ्या

ढासळलेलं, तुटलेलं छप्पर पाहून
मन निराश झालं होतं ...
किती आठवणी, स्वप्ने... विखरून गेली,
उतरवली गेली भिंतीवरून !

दोरी, भोवरा, खुपश्या गोट्या,
पतंगाच्या त्या रंगीत शेपट्या ,
ज्या राहून गेल्या होत्या चिटकविण्याच्या...
खजिना, खोक्यात...
फक्त एवढाच होता माझ्या जवळ...!

कोपऱ्यातील खिडकी
तोडली नव्हती अजुन, जीथे
स्ट्रीट लाईटच्या उजेडात...
रात्रीत बसायचो कधी...
पुस्तक घेऊन अभ्यास करीत !

अभ्यास करता करता...
विविध भारती ऐकायचो, तो
ट्रांजिस्टर सुद्धा हरवलाय कुठेतरी!
माणुसकी सारखा...!

बाल्कनी अर्धवटच तुटलेली
कदाचित, माझ्या भूतकाळाला शोधत,
कोणाची नजर गुंतलेली तिच्यावर?
शेजारच्या ईमारतीतुन ...!

भितींचा तो तुटलेला सारा ढिगारा
कित्येकांची स्वप्ने दडपुन गेला,
स्वप्ने, ओरडून बोलावित असतील!
त्यातुन...
पण कुणाला ऐकू येतात?

रात्रीत... भीतीदायक वाटतात,
पायऱ्या, त्या तुटलेल्या जिन्याच्या
हुंदके देत असतात...
पावलांच्या चाहुलीं साठी...!

आपल्या जाणिवा वाढु लागल्या,
नव्या नव्या तंत्रज्ञाना सोबत?
ती ओढ, तो ओलावा.
उब, आर्द्रता... नात्यातील...
विरून गेली...  कदाचित?

ऐकलंय...
टाँवर होणार आहे येथे,
हाय फाय, वाय फाय !
मग कोण कुणाशी बोलणार?
लिफ्ट येणार, तेव्हां
कोण चालणार पायऱ्यांवर?

© शिवाजी सींगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t25522/new/#new

दे धक्का...! जगणं समानतेचं


दे धक्का...!
जगणं समानतेचं

होवु पहातोय रे महासत्ता
स्वातंत्र्याची सत्तरी येतांना,
तरीही तोडू शकलो नाही
आम्ही जातीधर्मांच्या बंधना !

शक्तीप्रदर्शने होतात नित्य
आरक्षाणाच्या ध्येय्या साठी,
वेळ आली आहे मित्र...हो
सर्व समानतेने जगण्या साठी!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25507/new/#new