गुरुवार, २ नोव्हेंबर, २०१७

शहर

शहर

http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t29768/new/#new

हायकू २०५-२०७

#हायकू २०७
आल्हाद गंध
दे सुवर्णचंपक
मन प्रसन्न ०१-११-२०१७

#हायकू २०६
दव पहाट
पाखरांचा रियाज
किलबिलाट ३१-१०-२०१७

#हायकू २०५
वाऱ्याचे येणे
हळूवार स्पर्शने
सुरेल गाणे २९-१०-२०१७

रविवार, २९ ऑक्टोबर, २०१७

हायकू २०२-२०४

#हायकू २०४
छायाचित्र सौजन्य: गुगल


#हायकू २०३
माणिक मोती
देणं हे निसर्गाचं
दव बिंदूचं २६-१०-२०१७

#हायकू २०२
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर


आत्महत्या

उरी सतत चिंता घेऊन जगणाऱ्या बळीराजाच्या आक्रोशाची ओळख करून देणाऱ्या एका #संहितेतील भावनांना कवितेत मांडण्याचा प्रयत्न पुढील #आत्महत्या कवितेत केला आहे... 

#आत्महत्या

अशीच आवस्था आमची
आभाळासबी दया वाटंना,
भुईला नाही थोडसं पाणी 
शेतामधी पण पिक येईना !

भोग कसले वाट्यास ईथं
मनी मरणाचा पिंगा घुमतो,
यातना ह्या सोसता सोसता
आत्महत्येचाच ईचार येतो!

'अज्ञानात सुख हाय म्हणं'
आमीबी ठाई ठाई ऐकलय,
शिक्षाण घेऊन काय झालं?
दारिद्र्यच वाट्याला आलयं!

आता तरी काढा हो झापडं
डोळ्यांवरची ती पांघरलेली,
जाण ठेवा तुम्ही सरकार हो
व्यवस्था बळीनं सावरलेली!

©शिवाजी सांगळे 🦋 २६-१०-२०१७

धडपड

एका मित्राच्या विनंती नुसार "नोकरी गेलेला, बेकारीला कंटाळलेला व एका मुलीचा पिता असलेला तरूण मुलीच्या भविष्यासाठी नाईलाजाने तृतीयपंथी असल्याचे सोंग करतो... व पकडला जातो"
या प्लाँटवर आधारित एक छोटी #संहिता व तीला पुरक अशी पुढील #धडपड कविता लिहून देण्याचा योग आला...
छान वाटतयं...

#धडपड

असुनही मी पुरुष सुद्धा
ईच्छा नाहीच हो माझी,
कपडे बाईचे अंगी वापरणं
सवय नाहीच हो माझी !

नका हेटाळू तुम्ही मला
पोटासाठी धडपड माझी,
दु:ख वाट्यास मुलीच्या
न येवो कधी ईच्छा माझी !

शिक्षण, नोकरी, आरोग्य
सर्वांस प्राप्त आस माझी,
मिळो सर्वांना सुखशांती
हीच प्रार्थना आहे माझी !

#शिवाजी_सांगळे© 🦋 २६-१०-२०१७

सोमवार, २३ ऑक्टोबर, २०१७

हायकू १९९-२०१

सर्व छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू २०१


#हायकू २००


#हायकू १९९


सोमवार, १६ ऑक्टोबर, २०१७

हायकू १९६-१९८

सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
🌹🌹

#हायकू १९८


#हायकू १९७

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू १९६

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर