उरी सतत चिंता घेऊन जगणाऱ्या बळीराजाच्या आक्रोशाची ओळख करून देणाऱ्या एका #संहितेतील भावनांना कवितेत मांडण्याचा प्रयत्न पुढील #आत्महत्या कवितेत केला आहे...
#आत्महत्या
अशीच आवस्था आमची
आभाळासबी दया वाटंना,
भुईला नाही थोडसं पाणी
शेतामधी पण पिक येईना !
भोग कसले वाट्यास ईथं
मनी मरणाचा पिंगा घुमतो,
यातना ह्या सोसता सोसता
आत्महत्येचाच ईचार येतो!
'अज्ञानात सुख हाय म्हणं'
आमीबी ठाई ठाई ऐकलय,
शिक्षाण घेऊन काय झालं?
दारिद्र्यच वाट्याला आलयं!
आता तरी काढा हो झापडं
डोळ्यांवरची ती पांघरलेली,
जाण ठेवा तुम्ही सरकार हो
व्यवस्था बळीनं सावरलेली!
©शिवाजी सांगळे 🦋 २६-१०-२०१७
#आत्महत्या
अशीच आवस्था आमची
आभाळासबी दया वाटंना,
भुईला नाही थोडसं पाणी
शेतामधी पण पिक येईना !
भोग कसले वाट्यास ईथं
मनी मरणाचा पिंगा घुमतो,
यातना ह्या सोसता सोसता
आत्महत्येचाच ईचार येतो!
'अज्ञानात सुख हाय म्हणं'
आमीबी ठाई ठाई ऐकलय,
शिक्षाण घेऊन काय झालं?
दारिद्र्यच वाट्याला आलयं!
आता तरी काढा हो झापडं
डोळ्यांवरची ती पांघरलेली,
जाण ठेवा तुम्ही सरकार हो
व्यवस्था बळीनं सावरलेली!
©शिवाजी सांगळे 🦋 २६-१०-२०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा