गुरुवार, १२ जुलै, २०१८

ईच्छा

ईच्छा

कोण गातोय पहावा कशाला
मैफलीत ही वाहवा कशाला

धरेचा नभा बुलावा कशाला
सरींचा हा कांगावा कशाला

होय पावसात ईच्छा भजींची
डाळभात कोणा हवा कशाला 

ठरवावा कुठे बेत फिरण्याचा
घरात मुक्काम ठेवा कशाला

पावसाचा या आस्वाद घेता
सर्दी पडशाची दवा कशाला

भाजी भाकरी खाता कष्टाची
काजू बदाम न् मेवा कशाला

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t31053/new/#new

शुक्रवार, ६ जुलै, २०१८

थेंब स्पर्श


४८७/०६०७२०१८

गूढ नातं


४८६/०५०७२०१८

संजीवक


संजीवक जो, सत्व परीक्षा घेतो
पाऊस तो, हाहाःकार घडवितो,
तरीही तो येतो, सुखावून जातो
तृषार्त मनाला, ओलावून जातो !
©शिव
४८५/०५०७२०१८

यादें