सोमवार, १० सप्टेंबर, २०१८

हायकू ३६६-३६८

#हायकू ३६८
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू ३६७
अनुभवांती
जगण्या मोल आले
वय वाढले ०७-०९-२०१८

#हायकू ३६६

छायाचित्र सौजन्य: श्री राजू शिंदे

रविवार, ९ सप्टेंबर, २०१८

डाव

डाव 

घरच्यांच्या एकजूटीत चांगला ताव होता 
पाडणे एकटे मला हा ठरला डाव होता 

अचानक बोलणे त्यांचे लाघवी कसे झाले 
साऱ्यांच्याच बोलण्यात साळसूद भाव होता 

मान खाली घालून बोलणाऱ्या पोपटाच्या 
हावभावात युद्ध जिंकल्याचाच आव होता 

पाहिले न दप्तर, उचलले ना कधी पेन, तोच 
समजत एक स्वतःला जणू बाजीराव होता 

ठिक झाले तसे, होतो सावध घेऊन शंका 
ठरलेला बेत त्यांचा, बरा मला ठाव होता 

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t31263/new/#new

शुक्रवार, ७ सप्टेंबर, २०१८

गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१८

उसासे

उसासे

गंधाळली रान माती, पाऊस ढळून गेल्यावर
येतात भरूनी डोळे, पाऊल वळून गेल्यावर

ऐकता पहाट उसासे, काळोखाने सोडलेले
आवळले पाश कवेचे, रात्र ती टळून गेल्यावर

गुणगुणता कानात काल, गुज भुंग्याने हेच केले
दरवळतो गंध फुलांचा, बहर तो गळून गेल्यावर

रात्रीस धरपकड झाली, थोरामोठ्या सज्जनांची
महत्त्व कैदेचे कळले, चोर ते पळून गेल्यावर

पैसा आणि सत्ते मुळे, स्तर नि थर बदलून गेले 
मुरारी राजकीय नवे, धर्मास छळून गेल्यावर

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-song-lyrics/t31256/new/#new

मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१८

मांदियाळी


चालतो वारीत घेऊन
शब्दांची मांदियाळी,
गुंफूनी तयांना कधी
रचतो कविता, चारोळी
 ५०१/०४०९२०१८

शुक्रवार, ३१ ऑगस्ट, २०१८

मिजास

मिजास 

बदलाची आस असावी
जगण्याची प्यास असावी..!

डोक्यावरती जड ओझे
भाळी आरास असावी..!

वागो कोणी मग काही
सत्याची कास असावी..!

मैत्रीणी लाख जरी, ती 
एखादी खास असावी..!

निवडुंगा फूल फुलेतो
काट्यांस मिजास असावी..!

© शिवाजी सांगळे 🎭
 संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-song-lyrics/t31238/new/#new

बुधवार, २९ ऑगस्ट, २०१८

श्रावण सजला

श्रावण सजला 🌾🌿

खूप सुंदर श्रावण सजला
कवितेमधे अलगद मुरला

ओलसर त्या पहाट वेळी
प्राजक्तही मनी लाजला

सावरताच धवल सर्वांगा
केशरासह तो लडखडला

केवड्याने कात सोडता
काट्यांसही दरवळ फुटला

मोगरा निपचित या प्रहरी
मिटूनी कळी शांत निजला

भिजून येता दवात शब्द
पानांवर सुगंध सांडला

रानांत बहर फुलांत बहर
बहर मना मनात बहरला

व्रतवैकल्ये मनी ठसवुनी
श्रावण हा पुन्हा प्रकटला

खूप सुंदर श्रावण सजला
कवितेमधे अलगद मुरला

© शिवाजी सांगळे 🎭
 संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t31229/new/#new