गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१८

उसासे

उसासे

गंधाळली रान माती, पाऊस ढळून गेल्यावर
येतात भरूनी डोळे, पाऊल वळून गेल्यावर

ऐकता पहाट उसासे, काळोखाने सोडलेले
आवळले पाश कवेचे, रात्र ती टळून गेल्यावर

गुणगुणता कानात काल, गुज भुंग्याने हेच केले
दरवळतो गंध फुलांचा, बहर तो गळून गेल्यावर

रात्रीस धरपकड झाली, थोरामोठ्या सज्जनांची
महत्त्व कैदेचे कळले, चोर ते पळून गेल्यावर

पैसा आणि सत्ते मुळे, स्तर नि थर बदलून गेले 
मुरारी राजकीय नवे, धर्मास छळून गेल्यावर

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-song-lyrics/t31256/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा