उतरा खरे
पार झाली सत्तरी, स्वतःच्याच घोळक्यात
का चघळता जवानी, तुम्ही रे बोळक्यात
छाटली जरी झाडे, जुन्या नव्या जातींची
एक जात हो त्यांची, बांधताच ओंडक्यात
कोणत्या दिशेने मग, फिरतील इथे वारे
जाणून कौल घ्या रे, जनातला थोडक्यात
उतरा खरे लोकांस, दिल्या आश्वासनांवर
घाव काठीचा उगा, हाणतील टाळक्यात
वाह वाह हो त्यांची, मी जरा काय केली
धरले जमेस त्यांनी, आपल्याच टोळक्यात
© शिवाजी सांगळे 🎭
मो. ९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-song-lyrics/t31602/new/#new
पार झाली सत्तरी, स्वतःच्याच घोळक्यात
का चघळता जवानी, तुम्ही रे बोळक्यात
छाटली जरी झाडे, जुन्या नव्या जातींची
एक जात हो त्यांची, बांधताच ओंडक्यात
कोणत्या दिशेने मग, फिरतील इथे वारे
जाणून कौल घ्या रे, जनातला थोडक्यात
उतरा खरे लोकांस, दिल्या आश्वासनांवर
घाव काठीचा उगा, हाणतील टाळक्यात
वाह वाह हो त्यांची, मी जरा काय केली
धरले जमेस त्यांनी, आपल्याच टोळक्यात
© शिवाजी सांगळे 🎭
मो. ९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-song-lyrics/t31602/new/#new