बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०

कायदा


भाव मनीचे कळणे न कळणे

वेळेचा तो एक कायदा ठरवतो

एकदा का समजून भाव येता

कोण तोटा कोण फायदा ठरवतो 

७०३|१८०८२०२० 

~शिव

सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०

तुष्टि


























१२४|१७०८२०२०

ख़ुशी

 


























२८०|१७०८२०२०

कोरोनायण

कोरोनायण 

ठेवावी लागते | सामाजिक दूरी |

आहे महामारी | कोरोनाची ||


रूप माणसाचे | समजले त्यात | 

विभिन्न ढंगात | खऱ्या अर्थी ||


कोंडून स्वतःला | दूरस्थ रहातो |

कोण कुठे जातो | अकारण ||


साथी मुळे या | आले हो बंधन |

मुखी आवरण | मास्क रूपी ||


ओळख टाळण्या | कुणा उपयोगी |

वापरती रोगी | तोची मास्क || 


प्रसिद्धी रोजची | भरती मरती |

रूग्णांची गणती | माध्यमाते ||


चावड्या उठल्या | बेकार बिचारे | 

सान थोर सारे | खेडोपाडी ||


मोठाल्या शहरी | एक बरे झाले | 

चौकातून गेले | प्रदूषण ||


कोरोना कारणे | सजती आगळे |

उत्सव सोहळे | जेथे तेथे ||


लाँक डाऊनचे | सुटो हे ग्रहण |

मुक्त हो श्वसन | सर्वासाठी ||


कहर कोरोना | आता रे संपवा | 

विनवीतो शिवा | शेवटासी ||

https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t32763/new/#new

©शिवाजी सांगळे 🦋

 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९