शनिवार, ७ मे, २०१६

खुणा आठवणींच्या

खुणा आठवणींच्या

विसरू कशा रे मना
आठवणींच्या त्या खुणा,
पाच वर्ष सोबतीच्या
रागा लोभाच्या निशाण्या !

काय सांगू मी जगाला
साथ तूम्हा वेड्यांची,
थँक्यू आणि साँरी
नाही गरज बोलण्याची !

मैत्रीच्या ह्या कहाण्या
उरतील आयुष्यभराला,
यशवंत व्हा भविष्यात
माझ्या शुभेच्छा तुम्हाला !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/maitri-marathi-kavita/t23479/new/#new

सिढीयाँ...

सिढीयाँ...

गीरे तुटे छतको देखकर
मायुस हुआ था मन...
कितनी याँदे, सपने... बिखर गये,
उतारे गये थे दिवारोंसे !

रस्सी, लट्टू, बहोत से कंचे,
रंगीन पूंछे उन पतंगोकी,
जो रह गयी थी चिपकानेकी...
खजाना, बक्से में...
बस् ईतना ही था मेरा...!

कोने वाली खिडकी
नहीं टुटी थी अब तक, जहां
स्ट्रीट लाईट के उजाले में
बैठा करता था रातों में कभी
किताब लेकर पढने...,

पढते पढते...
विविध भारती सुनता था, वह
ट्रांजिस्टर गुम हुआ है कहीं!
ईन्सानियत कि तरहां !

आधी ही टूटी थी बाल्कनी
शायद, मेरे अतित को ढुढती,
कोई नजरें गडी थी उसपर?
बगल वाली बिल्डींग से...!

दिवांरो का वह मलबा,
कईयों के सपने दबा गया,
सपने, चिंखकर बुलातें होंगे!
उनमें से...
पर किसे सुनाई देते है?

डरावने लगते है, रातमें...
पायदान, उन टुटे सिढीयोंके
सिसकते रहते है...
कदमों कि आहट के लिए...

एहसास बढ गयें हमारे,
नई तकनिक के साथ ?
वो गीलापण,
रीश्तों कि गर्मी, नमीं...
उड गयी शायद?

सुना है, टाँवर बनेगा यहाँ,
हाय फाय, वाय फाय !
फिर कौन किससे बोलेगा?
लिफ्ट आयेगी,
तो सिढीयों पर कौन चलेगा?
© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/hindi-kavita/t23150/new/#new

शुक्रवार, ६ मे, २०१६

प्रवास?

प्रवास?

सारेच ते सोबती
अधुर्‍या प्रवासाचे,
शेवटास उरतात
क्षण आठवणींचे !

आपणच ठरवितो
नियम जगण्याचे,
विसरतो कधीकधी
आम्ही दान दैवाचे !

कळावे ना कसे?
बंध ते परस्परांचे?
पहावे विसरून केंव्हा
भाव स्वार्थी मनाचे !

© शिवाजी सांगळे 🎭

मंगळवार, ३ मे, २०१६

दे धक्का...! गप्पा आणि डंका

दे धक्का...!

गप्पा आणि डंका

कित्तेक जणांनी आजवर
सुधारणांच्या केवळ गप्पा केल्या,
मोजके प्रामाणिक सोडता
बाकीच्यांनी चपलाच झिजवल्या !

गटा तटाचा पिटून डंका
अनेकांशी घेतला संसार करून,
जेंव्हा कधी स्वत: सुधारले
जाउ लागले स्वकीयांना टाळून !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-23631/new/#new