शुक्रवार, ६ मे, २०१६

प्रवास?

प्रवास?

सारेच ते सोबती
अधुर्‍या प्रवासाचे,
शेवटास उरतात
क्षण आठवणींचे !

आपणच ठरवितो
नियम जगण्याचे,
विसरतो कधीकधी
आम्ही दान दैवाचे !

कळावे ना कसे?
बंध ते परस्परांचे?
पहावे विसरून केंव्हा
भाव स्वार्थी मनाचे !

© शिवाजी सांगळे 🎭

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा