मंगळवार, ९ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! जगण्याचा नियम


दे धक्का...!
जगण्याचा नियम

नुकताच परिवहन मंत्र्यांनी
जारी केला आहे फतवा,
रस्ते नियम मोडणार्‍यांच्या
दंडात केला आहे वाढवा !

सुरक्षित पणे चालवा वाहने
पाळून वाहतुकिचे सर्व नियम,
काळजीपुर्वक जगा, जगु द्या
हाच आहे जगण्याचा नियम !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24938/new/#new

रविवार, ७ ऑगस्ट, २०१६

आभाळ मनातलं

आभाळ मनातलं

बरेच मळभ दाटलेले,
अन्, सर पावसाची आली
थोड्यातच सरून गेली,
दुसरी सर मनात आली...
बरीच थांबलेली, ओथंबलेली
का असं झालं?
अगदि भरून आलं?
पाझरू लागले अश्रु,
आणि वाटू लागलं हलकं,
कसं असतं ना,
वर ढग दाटतात,
मनात? विचार दाटतात...
मोकळं होईस्तोवर
पिंगा घालतात!
कसले कसले विचार ते?
स्वत: फसवल्याचे!
कि फसले गेल्याचे?
नकळत काही केल्याचे?
पाप पुण्याच्या कल्पना...
मग, घेवु लागतात जन्म
स्वत:ला वाचवू पाहतात,
सोई प्रमाने जगायला
शिकवु लागतात,
उतरणार्‍या क्षार दवांना
थिजवु लागतात...
का हे असं होत?
मनातलं आभाळ दाटतं?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t24927/new/#new

माणसं


शनिवार, ६ ऑगस्ट, २०१६

वाट वळणाची


झाले काल काही

झाले काल काही

नाते सुखाशी कधी, कसे जुळलचे नाही,
साथ मैत्रीचा दुःखांनी, त्या सोडला नाही!

साक्ष दिल्या सुखाची, देण्यास कोण आहे?
जल्लोष मज सुखाचा,दवंडीत घुमतो आहे!

निसटते ओंजळ वाळू, कोणास ठाव आहे?
सुर्यास्त इथे नित्याचा, किनारा एकटा आहे!

झाले काल काही, सारे ते विरूनी गेले,
सांजवेळी का असे, पुन्हा आठवुन आले?

© शिवाजी सांगळे 🎭

दे धक्का...! एकमत


दे धक्का...!
एकमत

परस्परांना विरोध करणारे नेते
फायद्यासाठी एकमताने तयार होतात,
कोणतीही घासाघीस न करता
स्वतःचे पगार,भत्ते वाढवुन घेतात !

मंत्री, राज्यमंत्री व आमदारांचे
वेतन सचिवांच्या बरोबरीने होणार,
अधिवेशनाचं फलित होवो न होवो
सातवा वेतन आयोग लागू होणार !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24902/new/#new

शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! घातपात


दे धक्का...!
घातपात

दुर्घटनेची कारणे आता
सर्वांकडून शोधली जातील,
आरोप प्रत्यारोप करून
चौकश्यांचे फार्स केले जातील!

एकदा विचारा त्या नदीला
का असा तीने अपघात केला?
तीही सांगेल, उपसुन वाळू
तुम्हीच माझ्याशी घातपात केला!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24896/new/#new

गुरुवार, ४ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! उत्तर राहून गेले


दे धक्का...!
उत्तर राहून गेले

वाहणारे पुरात वाहून गेले
कुटुंबियांचे अश्रु विरून गेले,
डंका पिटणारे कार्यक्षमतेचा
सुरक्षित गोंधळ करून गेले !

बांधलेल्या पुलाचा हिशोब
शतकानंतर गोरे सांगुन गेले,
द्यायचा दोष कोणास येथे ?
विचारून चारही खांब गेले !

© शिवाजी सांगळे 🎭

http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24878/new/#new

बुधवार, ३ ऑगस्ट, २०१६

वाटा...


वाटा

अश्वस्त किती काळ रहावे?
बांधली जरी शिल्पे तटावरी
फिरते घेउन वादळास येथे
लाट येण्या ती किनार्‍यावरी !

अखंडतेचा ध्यास धरावा
कुठवर आता ह्या पावलांनी,
उरतात जखमा येथल्या
वाळूवर मग कणा कणांनी !

हेलकावे मनाचे हे जणू
वाहतात या सागर लाटा,
उमटविल्या जरी कितीही
मिटतात वाळूवरील वाटा !

© शिवाजी सांगळे 🎭

http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t24872/new/#new

दे धक्का...! निष्काळजीचा फटका


दे धक्का...!
निष्काळजीचा फटका

निष्काळजी पणाचा फटका
ब्रिटीशकालीन पुलाने दिला,
आगावु सुचना मिळून सुध्दा
पुल वाहतुकीस होता खुला!

बेपत्ता झालेली माणसं, वाहनं
कधी, कशी शोधली जाणार?
घडलेल्या दुर्घटनेची अंतरीम
जबाबदारी आता कोण घेणार?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24870/new/#new