शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६

पायऱ्या

पायऱ्या

ढासळलेलं, तुटलेलं छप्पर पाहून
मन निराश झालं होतं ...
किती आठवणी, स्वप्ने... विखरून गेली,
उतरवली गेली भिंतीवरून !

दोरी, भोवरा, खुपश्या गोट्या,
पतंगाच्या त्या रंगीत शेपट्या ,
ज्या राहून गेल्या होत्या चिटकविण्याच्या...
खजिना, खोक्यात...
फक्त एवढाच होता माझ्या जवळ...!

कोपऱ्यातील खिडकी
तोडली नव्हती अजुन, जीथे
स्ट्रीट लाईटच्या उजेडात...
रात्रीत बसायचो कधी...
पुस्तक घेऊन अभ्यास करीत !

अभ्यास करता करता...
विविध भारती ऐकायचो, तो
ट्रांजिस्टर सुद्धा हरवलाय कुठेतरी!
माणुसकी सारखा...!

बाल्कनी अर्धवटच तुटलेली
कदाचित, माझ्या भूतकाळाला शोधत,
कोणाची नजर गुंतलेली तिच्यावर?
शेजारच्या ईमारतीतुन ...!

भितींचा तो तुटलेला सारा ढिगारा
कित्येकांची स्वप्ने दडपुन गेला,
स्वप्ने, ओरडून बोलावित असतील!
त्यातुन...
पण कुणाला ऐकू येतात?

रात्रीत... भीतीदायक वाटतात,
पायऱ्या, त्या तुटलेल्या जिन्याच्या
हुंदके देत असतात...
पावलांच्या चाहुलीं साठी...!

आपल्या जाणिवा वाढु लागल्या,
नव्या नव्या तंत्रज्ञाना सोबत?
ती ओढ, तो ओलावा.
उब, आर्द्रता... नात्यातील...
विरून गेली...  कदाचित?

ऐकलंय...
टाँवर होणार आहे येथे,
हाय फाय, वाय फाय !
मग कोण कुणाशी बोलणार?
लिफ्ट येणार, तेव्हां
कोण चालणार पायऱ्यांवर?

© शिवाजी सींगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t25522/new/#new

दे धक्का...! जगणं समानतेचं


दे धक्का...!
जगणं समानतेचं

होवु पहातोय रे महासत्ता
स्वातंत्र्याची सत्तरी येतांना,
तरीही तोडू शकलो नाही
आम्ही जातीधर्मांच्या बंधना !

शक्तीप्रदर्शने होतात नित्य
आरक्षाणाच्या ध्येय्या साठी,
वेळ आली आहे मित्र...हो
सर्व समानतेने जगण्या साठी!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25507/new/#new

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०१६

दे धक्का...! विकृत पशु


दे धक्का...!
विकृत पशु

पुन्हा एकदा राजधानी
नव्या घटनेने हादरली,
आणखी एक तरूणी
जीवानिशी फुका गेली !

कुठे चाललाय समाज?कि
संस्कारच ते खोटे झाले?
कसे असे, हे विकृत पशु
माते उदरी जन्मा आले !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25497/new/#new

दे धक्का...! औकात


दे धक्का...!
औकात

हल्ली तर अतिरेकी हल्ले
देशात होतात का हो थोडे?
तरी आम्ही उधळत असतो
अंतर्गत आरक्षणाचे घोडे !

गरज तशी आता एकजुटीत
खंबिरतेने राहण्याचीे आहे,
शेजार्‍याल्या त्याची औकात
दाखवण्यात खरा दम आहे !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25489/new/#new

बुधवार, २१ सप्टेंबर, २०१६

दे धक्का...! उर बडवे


दे धक्का...!
उर बडवे

कित्तेक आजवर शहीद झाले
तेंव्हा न आला कधी भरून उर?
मरता कधी एखाद आतंकवादी
लागतात येथले बडवायला उर !

बुध्दिजीवी हाे तोंडास तूमच्या
का लावला आता तूम्ही टाळा?
आतंकवाद्यांनी आणला जेंव्हा
काश्मिरीं लोकांच्या पोटी गोळा!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25479/new/#new

सोमवार, १९ सप्टेंबर, २०१६

दे धक्का...! तू रे माणसा


दे धक्का...!
तू रे माणसा

चमत्कारा असतो नमस्कार
खुर्चीची असते माया सारी,
कुणीही असो मग खुर्चीमधे
खुर्चीमागे दौड लागते दारी !

उगवत्या असे इथे नमस्कार
मावळत्या मग कोण विचारी?
असता सत्ताधिकारी माणसा
मनास प्रश्न तु, का न विचारी !

© शिवाजी सांगळे🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25468/new/#new

शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०१६

दे धक्का...! नंबर दोन


दे धक्का...!
नंबर दोन

उपराजधानीतच आताशा
गुन्हेगारी फार वाढत आहे,
पोलिसांवर हल्ले करणारे
जेलमधुन पसार होत आहे !

या स्पर्धेत सुध्दा आता
राज्य अग्रेसर होत आहे,
एनसीआरबी मता नुसार*
यु.पी. नंतर महाराष्ट्र आहे!

*नँशनल क्राईम रेकाँर्ड ब्युरो

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25436/new/#new

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०१६

जगण्याचा फंडा

जगण्याचा फंडा

काही हसून बोलायचं
काही बोलून हसायचं
जीवन असचं आहे
हसता हसता रडायचं
न् रडतांना हसायचं...!

जगण्याचे कष्ट तर
सगळ्यांनाच आहेत,
मित्रा, कष्टाला डिवचुन
मजेत हसत खेळायचं...!

जोकरला विचारून बघ
असं कस जमवायचं?
दुःखात सुध्दा हसायचं
हसता हसता रडायचं...!

हसुन नाही जमल
तर रूसुन बोलायचं
आपल्या लोकांचे
अश्रु पुसत बोलायचं...!

जगण्याचा फंडा
तसा सोपा आहे यार
दुसर्‍यांच्या मनात
घर करून रहायचं...!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/preranadai-kavita/t25408/new/#new

दे धक्का...! "अच्छे दिन"ची हड्डी


दे धक्का...!
"अच्छे दिन"ची हड्डी

"अच्छे दिन" चा नारा म्हणे
सर्वात आधी काँग्रेसने दिला,
आम्ही केवळ घोषणा देताच
हड्डीचा घास गळयात गुंतला!

अतृप्त आत्म्यांच्या या देशात
"अच्छे दिन" कधी येणार?
कायम प्रश्न घेवुन मनात हा
गडकरी आता कुठे फिरणार?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-'-'-25421/new/#new

बाप्पा रे...!