शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! "राज" कारण


दे धक्का...!
"राज" कारण

फिरून फिरून आम्ही
तीथंच पुन्हा परत येत असतो,
खाउन झालं किती तरी
शिळ्या कढीस उत आणत असतो !

"राज" कारण म्हटलं तर
सोयी नुसार विषय घेत असतो,
दर दोन पाच वर्षां नंतरच
महाराष्ट्रासाठी उर भरून येत असतो !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-''-25068/new/#new

बुधवार, १७ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! श्रीमंतीचे परीक्षण


दे धक्का...!
श्रीमंतीचे परीक्षण

पापक्षालना साठी, माणुस
नेहमी जातो देवाच्या दारी,
देवास काय ठावूक, माणुस
तीथेही करीत असतो चोरी !

आपोआप गायब होते सोने
पद्मनाभ मंदिरातून कोटींचे,
काढावेच सरकारने शोधुन
गुंतलेले हात ज्या कोणाचे !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25060/new/#new

मंगळवार, १६ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! बंधन


दे धक्का...!
बंधन

बंधनात अडकतात नाती
राजकारणात का टिकती?
आधी शिवबंधन होते,आता
अटलबंधनाची हो चलती !

समयानुसार होताना बंधने
तयास म्हणतात वाटे युती?
वाटा नसता सत्तेत, कधी
होते भाषा, तोडण्याची युती!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25037/new/#new

सोमवार, १५ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! सत्तरीतलं स्वतंत्र्य?


दे धक्का...!
सत्तरीतलं स्वतंत्र्य?

गौरव करता करता इतिहासाचा
भविष्याचा विचार कधी करणार?

आधुनिक युगात आम्ही जगतांना
अंधाअनुकरण किती करणार?

दलित व महिलांवरचे अत्याचार
सत्तराव्या वर्षी असेच का राहणार?    

असंख्य सारे प्रश्न अनुत्तरीत असे
पिच्छा आमुचा कधी सोडणार?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25025/new/#new

रविवार, १४ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! तिरंगा


दे धक्का...!
तिरंगा
भारत माझा देश महान
आम्हा त्याचा अभिमान,
पाहतो त्या बनवु आम्ही
जगती एक मोठी शान !

मान आमुचा असे तिरंगा
फडकावू आम्ही डौलाने,
स्वातंत्र्य दिना उपरांत, त्या
आम्हीच सांभाळू मानाने !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24996/new/#new

शनिवार, १३ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! उद्रेक


दे धक्का...!
उद्रेक

कायदा हातात घेणं, हे
कधीच समर्थनिय नाही,
म्हणुन प्रशासनाने का?
समस्यांकडे पहायचे नाही?

रोज म.रे., स्तोव जगतांना
प्रवासी जीव टांगुन असतो,
नसता सुचना सहानुभुतीच्या
मग प्रवाश्यांचा उद्रेक होतो !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24989/new/#new

रंग भाव



प्रभु तू कृपाळु...

"प्रभु तु दयाळू, कृपावंत दाता" या मुळ गाण्याचे विडंबन, गीतकार श्री उमाकांत काणेकर यांची क्षमा मागुन...

प्रभु तू कृपाळु...

प्रभु तु कृपाळु, रेल्वे मंत्री मोठा
वेळेवरी सोड तूच गाड्या आता!

कामधंद्या जाण्या दिली रेल गाडी
जाता येता काढे आमुची ती खोडी
प्रवासा नसे रे दुजा मार्ग आता...

तुझ्या गाड्यांमधे नसता सोई फार
करीतो प्रवास इथला लहान थोर
ऐकूनी सतत अनाउंन्समेंट बाता...

आम्हा प्रवाश्यांना सुख काय ठावे
मजबुरी मुळेच लागे स्टेशना यावे
अन्य कुठे जावे तुच सांग आता...

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/vidamban-kavita/t24993/new/#new

शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! पाकिस्तानी हात


दे धक्का...!
पाकिस्तानी हात

काश्मिर मधला हिंसाचार
हे पाकिस्तानचचं बीज आहे,
कसाब नंतर, बहादूर अलीनंही
आता जग जाहिर केलं आहे !

पाकिस्तान सैन्यानं कितीही
नाहि म्हटलं, तरी हे सत्य आहे,
भारतातील हिंसाचारा मागे
हिजबुलसह त्यांचाच हात आहे !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24974/new/#new

बुधवार, १० ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! बदलतं वारं!


दे धक्का...!
बदलतं वारं!

कुठे भ्रष्टाचार, कुठे घोटाळे
विनयभंग तर कुठे बलात्कार,
राजकिय सत्ता चढाओढीतून
आरोप प्रत्यारोपांचा भडीमार!

गो रक्षे वरून वादावादी, तर
उनात दलितांवर अत्याचार,
लगीनघाई आहे जीएसटीची
अन् सोबत महागाईचा मार !

कुणा स्वतंत्र राज्याचा हट्ट, तर
आतंकवादाने मेलं काश्मिर खोरं,
दिसतयं सत्य उघड्या डोळ्यांनी
पण आडवं येतं राजकारण सारं!

प्रत्येकाला वाटत असावं, कि
आम्ही करतोय ते ठिकचं सारं,
बदलेलं आहे निसर्गाने आधीच
देशात सुध्दा बदलतयं ना वारं?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-!-24947/new/#new