रविवार, १५ जानेवारी, २०१७
शुक्रवार, १३ जानेवारी, २०१७
मकर संक्रांत सण स्नेहाचा'
http://tarunbharat.net/archives/13507
'मकर संक्रांत सण स्नेहाचा'
आपला भारत देश सण उत्सवांचा देश आहे. विविधतेने नटलेल्या आपल्या देशात अनेक जाती परंपरा नुसार विविध सण साजरे करण्याची परंपरा इथे आहे. येथे प्रत्येक सणाशी संबंधित चांगल्या प्रथा परंपरा आहेत व या प्रथा परंपरा खूप विशेष मानल्या जातात, बऱ्याच प्रथां परंपरा मागे धार्मिक तर काही परंपरा मागे वैज्ञानिक कारणे आहेत. हिंदू पंचांगातील तिथी प्रमाणे आपल्या कडे साजरे होणारे सर्व सण, व्रत वैकल्ये हे नक्कीच हवामान, आरोग्य व आयुर्वेदाचा सखोल विचार करून धर्मशास्त्रकारांनी त्या त्या काळात प्रयोगात आणले आहेत. अनेक सणां पैकि ‘मकर संक्राती’ हा देशात साजरा केला जाणारा राष्ट्रीय सण म्हणायला हवा.
हिंदू श्रद्धेनुसार सूर्य प्रत्यक्ष ब्रह्मतत्त्वाचे रूप आहे, जे एक, अद्वैत, स्वयं प्रकाशमान, दैवत्वाचे प्रतिक आहे. वर्षभरात सूर्याची मेष, वृषभ, मिथुन इत्यादी बारा राशीत संक्रमणे क्रमाक्रमाने होत असतात. यांतील सर्वात प्राचीन काळापासून ओळखली गेलेली संक्रमणे म्हणजे कर्क आणि मकर; असे का? त्याचे कारण ते दिवस वर्षातले वैशिष्ट्यपूर्ण दिवस आहेत. कर्क संक्रमणाच्या दिवशी आपल्याकडे (उत्तर गोलार्धात) सर्वात मोठा दिवस आणि लहान रात्र असते; तर मकर संक्रमणाच्या दिवशी सर्वात लहान दिवस आणि मोठी रात्र असते. त्याबरोबरच, सूर्याचे उत्तरेकडे मार्गक्रमण मकर संक्रमणापासून सुरू होते. कारण त्या दिवसापासून सूर्य उत्तरेकडे झुकू लागतो. म्हणजेच सूर्य उत्तर गोलार्धात प्रवेश करता होतो, यालाच उत्तरायणारंभ म्हणतात आणि त्या दिवसापासून दिवसाची लांबी वाढू लागते व उन्हाळ्याची सुरूवात होते व सुर्याच्या उगविण्याची जागा दिवसें दिवस उत्तरेकडे सरकते हे लक्ष पुर्वक पाहिल्यास आपल्याला समजु शकते.
संपुर्ण देशात मकर संक्रांतीला वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते, जसे पंजाब, हरियाना येथे लोहडी, लोहळी म्हणतात, उत्तर भारतात या सणाला ‘खिचडी संक्रांत’, उत्तर पुर्व प्रांतात बंगाल, आसामध्ये ‘भोगाली बिहू’ म्हणत तो दिवस त्यांच्या वर्षारंभाचा देखील असतो, दक्षिण भारतात ‘पोंगल’, गुजरात मध्ये ‘उत्तरायण किंवा पतागांचा’ सण म्हणतात. या काळात देशभर अनेक यात्रांची सुरवात होते, यात प्रमुख म्हणजे प्रत्येक बारा वर्षांनी हरिद्वार, प्रयाग, उज्जैन व नासिक अशा चार जागी चक्राकार पद्धतीने आयोजित होणारा कुंभमेळा होय. कोलकाता शहरा जवळ जेथे गंगा नदीचा बंगालच्या उपसागराशी संगम होतो तेथे गंगासागर यात्रा आयोजित केली जाते, तसेच दक्षिणेत शबरीमला, केरळ येथे मकरज्योतीचे दर्शन घेण्या साठी सुध्दा असंख्य भाविकांची गर्दी होते. महाराष्ट्रात कोकणात मकर संक्रांतीलाच मार्लेश्वराची यात्रा भरते व त्या दिवशी शंकर-पार्वतीचा शुभविवाह केला जातो.
महाराष्ट्रात संक्रांतीचा सण तीन दिवस १३ ते १५ जानेवारी पर्यंत अनुक्रमे गी, संक्रांती व किंक्रांती म्हणुन साजरा करतात. तिळाचे महत्त्व असण्याचे कारण म्हणजे मकर संक्रांत हिवाळ्याच्या मध्यावर साजरी होते व तीळ उष्ण प्रकृतीचे आहेत अन् तिळाच्या वापराने थंड आणि उष्ण यांचा समतोल राखण्यास मदत होउन आरोग्यास हितावह ठरतात.
१. तीळ पाण्यात घालून त्या स्नान करणे, २. तीळ भक्षण करणे, ३. तीळचे दान करणे.
वरील प्रमाणे तिळाचा उपयोग हे संक्रांतीचे खास वैशिष्टय मानावे लागेल, संक्रांतीला तिळाचे व गुळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खायचे तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाच्या डाळीची खिचडी, वांगी, सोताणे, वावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थाचा वापर जेवणात करायचा. तीळ वापरण्याचा दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतु तेव्हा या दिवशी या तिळ गुळाची देवाणघेवाण करून स्नेह वाढवायचा.
महाराष्ट्रात भोगीच्या दिवशी तिळ लावलेल्या बाजरीच्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, मूगाची डाळ, तांदूळ घालून केलेली खिचडी असा स्वयंपाक केला जातो. संक्रांतीला गुळाची, तसेच तिळाची पोळी करतात. मकर संक्रांतीपासून रथसमाप्तीपर्यंत एकमेकांना तिळगूळ देऊन 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्या साठी शुभेच्छा देतात. सुगडात (सुघटात) हळद-कुंकू, ऊसाचे करवे, हरभऱ्याचे घाटे, तीळ-गुळ घालून घरच्या देवांसह पाच ‘वायने’ अर्थात वाण द्यायची रूढी आहे. विवाहानंतर पहिली पाच वर्षे अनुक्रमे हळद-कुंकू, तीळ-गुळ, कंगवा, बांगड्या लुटण्याचीही म्हणजेच वाटण्याची पद्धत खूप ठिकाणी आहे. महिला हळदीकुंकू करून उपयोगी वस्तूचे वाण लुटतात. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांचा दोन्हीही घरी हौसेने सणही करतात. सुनेला हलव्याचे दागिने, काळी साडी घेतात व जावयांना हलव्यांचा हार, गुच्छ देतात. लहान मुलांचे बोरन्हाणही केले जाते.
आपल्या सर्वांना माझ्या कडून मकर संक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला'.
=शिवाजी सांगळे, बदलापूर,
९५४५९७६५८९ – ९४२२७७९९४१
बुधवार, ११ जानेवारी, २०१७
श्रीहरी
धोंडा पायरीचा
धोंडा पायरीचा
स्वार्थिया लेखी नित्य
पावतो तोच आपला,
कृपे साठी न् त्याच्या
काहीं करण्या धजला !
हाट भरवून भक्तीचा
का कुणा देव पावला?
स्वर्था साठीच म्हणुन
आप्तां तो अाठवला ?
दांभिक भक्तीला पण
परमार्थ कळू लागला !
धोंडा पायरीचा कसा
पहा देव आता झाला !
© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t26888/new/#new

मंगळवार, ३ जानेवारी, २०१७
केशर छटा
सोमवार, २ जानेवारी, २०१७
रश्मिराज
रविवार, १ जानेवारी, २०१७
नव पहाट
नव पहाट
उमजण्या कठीण झालो?
असेल, कधी कठोर झालो,
पण मित्रहो खरचं, मुद्दाम
तुमच्या प्रेमा अधीर झालो !
विणताे वस्त्र उबदार उद्याचे
त्यावर स्वप्ने रंगवुन तुमची,
विसरा सारे ते गिले शिकवे
पहातेय पहाट नव वर्षाची !
झाले गेले विसरून सारे
भविष्याचे गीत गातो आहे,
बुडवून जुन्यास पेल्यात
नव्याचा चषक भरतो आहे !
© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t26792/new/#new
गुरुवार, २९ डिसेंबर, २०१६
हाक अंतरीची
हाक अंतरीची
अस्तिक नास्तिकतेच्या सीमारेषा कुणी का ओढल्यात? माहित नाही? मी नाही मानत उगीच काही परंपरा. मनात नसता कुणाच्याही पाया पडणं किंवा चार लोक जातात म्हणून त्यांच्या मागे देवळात जाणं मला नाही पटत, भले मग कुणी मला नास्तिक म्हणो. माझ्या बाबतीत खुपदा असं होतं, का ते माहीत नाही. पुर्वी कामानिमित्त दौर्यावर जावं लागत असे, त्यामुळे बर्याच ठिकाणी भटकंती व्हायची, काम संपल्यावर त्या त्या वेळी व ठिकाणानुसार सोबतीचे कधी मंदिर, पार्क किंवा अन्य प्रेक्षणिय व प्रसिध्द स्थळांना भेटी द्यायचा बेत करीत, मलाही आवडायचं, एरवी सर्व ठिकाणी मी जायचा पण मंदिर वा अन्य धार्मिक ठिकाणी मी खुपदा जात नसे, याचं कारण मला आजही सांगता येत नाही परंतु बाकि लोकांच्या मते तेव्हा मी नास्तिक ठरायचो.
एकदा सोलापूर दौर्यावर असतांना सोबत्यांच्या हट्टाखातर श्री सिध्देश्वर मंदिरात पोहचलाे, सुरेख नक्षीकाम केलेलं दगडी हेमाड पंथी बांधकाम, चहुबाजुला बसविलेल्या किंवा कुणी भक्तांनी आणुन ठेवलेल्या वेगवेगळ्या आकारातील अनेक शिवलिंग प्रतिमा फारच विलोभनीय, मंद दरवळणारा कर्पुर, अगरबत्ती व धुपाचा सुगंध सोबत नित्य नविन येणार्या भक्तांकडून होणारा घंटानाद खुप छान वातावरण होते, तरीही मी काही तरी वेगळ शोधत होतो. एका विस्तृत अशा दगडी महिरपी असलेल्या सभामंडपात कुणा बाबांचे कानडी भाषेत प्रवचन सुरू होते, आम्हा सर्वांचे दर्शन सोपस्करही उरकले होते, काही काळ बसावं म्हणुन आम्ही तेथे कठड्यावरच बसलो. माझं ध्यान त्या बाबांच्या शब्दांवर, ते मी एकाग्रतेने ऐकत होतो, काय झालं ते समजलं नाही, त्या बाबांची भाषा कळत नव्हतीच परंतु त्यांच्या शब्दांत इतकं माधुर्य होतं कि मी तीथं गोठल्यागत झालो, अर्धातास उलटला, सोबती म्हणु लागले चल निघु, पण मी हललो नाही. काय होतं ते? त्यांते शब्द माधुर्य, वातावरणाचा प्रभाव? कि अंतरीची हाक? आजपावेतो न उमगलेलं कोडं, तसाच अनुभव श्री स्वामी विवेकानंद मेमोरीयल, कन्याकुमारी येथला आरपार भारून टाकणारा.
परमात्म्याचा अंश कधी नादातून, कधी स्वरातून तर कधी गंधातून जाणवतो, तेंव्हा आत्मा बरोबर तिथे ओढला जातो, मग ठिकाण मंदिर, दर्गा वा चर्च कोणतेही असो, स्वर उमजणारा,समजणारा जरी नसला तरीही तो मनाला भावतो व पर्यायाने आत्म्याला तेथे आेढून नेतो, कदाचित जीवा शिवाची भेट अशीच होत असावी? परम शांततेचा स्वर ॐकार असो किंवा मंदिरातल्या घंटेचा नाद, पहाटे पहाटे कानावर पडणारे अजानचे अविट स्वर नाहीतर चर्चमधे घुमणारा धीर गंभीर चर्चबेलचा आवाज असो, नकळत मनाला शांत करीत असतात, ही स्पंदणं हृदयाशी एकरूप होतात, काही वेळ तरी स्वतःला विसरायला लावतात.
चौदाएक वर्षांपुर्वी दक्षिण भारतात दौर्यावर गेलो होतो, निटसं लक्षात नाही बहुतेक रामेश्वरचा बस स्टँंड असावा, वेळ पहाटे सव्वा ते साडे चारची, डिसेंबरातली बोचरी थंडी, कोपर्याला शेकोटी करून ड्रायव्हर, कंडक्टर असे जोडी जोडीने शेकोटीच्या भोवती बसलेले, टेप रेकाँर्डवर कुठलसं दाक्षिंणात्य सुरावटीच भजन सुरू होतं, संगीताच्या त्या सुरांची काय जादू झाली कुणास ठावूक? मी आपसुक त्या शेकोटी कडे वळलो त्यांच्या पाठीमागे शांतपणे ऐकत उभा राहीलो, माहित नाही एक विलक्षण अनुभुती जाणवत होती, भजनातील एकही शब्द समजत वा कळत नव्हता, पण सुरांनी बांधुन ठेवलं होतं मला, कसा मग्न झालो त्यात समजलंच नाही, काही वेळने बरोबरचे लोक विचारू लागले काय झालं? माझ्याकडे काहीच उत्तर नव्हते, ज्या टोळक्यात उभा होतो ते सुध्दा चक्रावलेलेे, त्यातील एकाने विचारलंच "मल्याली?" मी नकारार्थी मान हलवित म्हटलं "महाराष्ट्र".
बहुदा असाच असावा आतला नाद, परम्यात्म्याशी नकळत कधी तरी जुळणारा, स्वतःतल्या "स्व" ची ओळख करून देणारा, म्हणुनच असावं कि सुर, स्वर, व नादाला जात धर्म नसतो, प्रांत वा देश नसतो, असतो तो केवळ जीवाशिवाचा ॠणानुबंध न दिसणारा न उमजणारा कुठेतरी निराकार ईश्वराच्या नाळेशी जोडलेला.
© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t26772/new/#new

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)