बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

पण काहीही म्हणा... समाज मन


पण काहीही म्हणा...
समाज मन

बलात्कार करणारा तो, तर
मुकाट बलात्कार करून जातो,
रस्त्यां रस्त्यावर समाज मात्र
सार्वजनिक मालमत्ता पेटवून देतो !

अश्याने का बलात्कार्‍यांच्या
वृत्तीत कधी, काही बदल होतो?
बदलायचे म्हणता, समाज मन
त्यावेळी आम्ही शांत का बसतो ?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t25693/new/#new

मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०१६

लोकल ट्रेन - जीवनवाहिनी



लोकल ट्रेन - जीवनवाहिनी

          मुंबई व तीच्या उपनगरातील लोकांची जीवनवाहिनी, अर्थात मुंबईची लोकल ट्रेन. अगदि छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) ते खोपोली, सीएसटी ते पनवेल तसेच चर्चगेट ते डहाणु पर्यंत राहणार्‍या चाकरमान्यांची हि लाईफ लाईन.

          उद्या दसरा सर्वांना सुटी असल्या मुळे एक दिवस अगोदरच मुंबईचा लोकल प्रवासी या लाईफ लाईनचं कौतुक करतो, तीची पुजा करतो, एक प्रकारे तीच्या बद्लची कृतज्ञता व्यक्त करतो. वर्षभरात जरी कधी ती उशीरा धावली, रद् झाली तरी तेवढ्या वेळापुरता तीच्यावर रागवणारा, वेळ प्रसंगी शिव्या देणारा, तीची अडवणूक करणारा प्रवासी दसर्‍याच्या दिवशी सर्व विसरून तीला सजवतो, नारळ, हार व प्रसाद अर्पण करतो तसेच त्या वेळी ड्युटीवर असलेले मोटरमन व गार्ड यांचा शाल व श्रीफळ देउन सत्कार करतो, प्रत्येकजण आपआपल्या कंपार्टमेंट मधे सजावट करून देवीप्रतिमेला गंध, पुष्प वगैरे अर्पुण आरती करतो नंतर प्रसाद दाखवुन अल्पोपहार व भेट वस्तुंचे वाटप करतो.  

          प्रवास संपता संपता पुढच्या वर्षी येणार्‍या दसर्‍याचे मनसुबे करीत आप आपल्या कामाला निघुन जातो. इतक्या दोन विरूद्ध टोकाचे स्वभाव दर्शन घडते मुंबईच्या लोकल प्रवाश्याचे. हि कहानी आहे मुंबईच्या धावत्या लोकलची व तीच्या प्रवाश्याची ...

          आम्ही पण आज सालाबाद प्रमाणे आमच्या सकाळच्या ८.११ बदलापूर ते सीएसटी लोकलची गाडीच्या अन्य प्रवाश्यासारखी पुजा केली व सर्व सह प्रवाश्यांसोबत अल्पोपहार करून आप आपल्या कामाच्या गंतव्य ठिकाणी उतरून मार्गस्थ झालो, पुढील दसर्‍याची वाट पाहण्या साठी.

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t25689/new/#new

सोमवार, १० ऑक्टोबर, २०१६

पण काहीही म्हणा... जय हो, वाघ


पण काहीही म्हणा...
जय हो, वाघ

नामशेष होणार्‍या वन्यजीवात
आता वाघांचीही वर्णी लागली,
जय वाघाच्या गायब होण्याने
सर्वत्र त्यांची चर्चा होउ लागली!

सरकार दरबारी पाहीलचं तर
बरेच कागदी वाघ नाचवले गेले,
संवर्धनाच्या आरोळ्या देणार्‍या
अधिकार्‍यांचे मांजर कसे झाले?

© शिवाजी सांगळे 🎭http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t25680/new/#new

शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०१६

पण काहीही म्हणा... रोप वे ची शक्कल


पण काहीही म्हणा...
रोप वे ची शक्कल

मेट्रो झाली नंतर मोनो झाली
एसी लोकलचीही चाचणी झाली,
गर्दी कमी करण्या साठी आता
रोप वे ची शक्कल कशी लढवली?

खरा प्रश्न गर्दीचा वेगळाच आहे
एकाच दिशेला सार्‍यांचा फ्लो आहे,
कार्यालयांचे विकेंद्रींकरण व्हावे
यावर हाच एकमेव तोडगा आहे !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t25653/new/#new

गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०१६

देह

!! देह !!

सुख दु:खा साठी, देह हो कारण !
पाप पुण्य ध्यान, मनातले !!

देह हा नश्वर, विकारांचे घर !
किती अवडंबर, करायाचे?

शुध्द देहा जोड, सात्विक विचार !
होई जो आधार, ध्याना सवे !!

देह शुध्दी मात्रे, सुचिर्भुत र्‍हावे !
मनी दृढ व्हावे, म्हणे शिवा !!

 © शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita/!!-!!-25638/new/#new

बुधवार, ५ ऑक्टोबर, २०१६

पण काहीही म्हणा... विरोधासाठी विरोध


पण काहीही म्हणा...
विरोधासाठी विरोध

कबूल  करतो  झालेले  हल्ले
तर पाकिस्तान नक्की फसतो,
तरी भारतीय सैन्याच्या कृतीवर
विरोधकांचा विश्वास का नसतो?

अविश्वास दाखवून घरचेच लोक
आता हल्ल्याचे पुरावे मागू लागले,
कायम चर्चेत राहण्या साठी का!
विरोधासाठी विरोध करू लागले?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t25626/new/#new

मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०१६

पण काहीही म्हणा... दुवा


पण काहीही म्हणा...
दुवा

प्रवासी सवलती जाहिर
करायच्या राज्य सरकारने,
न् आर्थिक घट सोसायची
मात्र एसटी महामंडळाने ?

सामान्यांचा हा लाल डबा
रस्त्यांवर धावायलाच हवा,
गाव शहरे जोडणारा दुवा
कसाही टिकायलाच हवा !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t25615/new/#new

पण काहीही म्हणा... उत्तर आणि खेळी


पण काहीही म्हणा...
उत्तर आणि खेळी 

आतंकवादाला तर आता
चोख उत्तर दिलेलेच आहे,
येवढ्यातच हे सारे संपेल?
हा विचार करणे गैर आहे !

शत्रू कोणती खेळी करील?
याचा काहिही भरोसा नाही,
हुरळून जात बेसावध राहणे
आपणासही परवडणारे नाही !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t25577/new/#new

शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०१६

पण काहीही म्हणा... प्रीपेड जेल वारी

पण काहीही म्हणा...
प्रीपेड जेल वारी

कुतुहल न् धाडसापोटी माणुस
माहित नाही काय करील?
पाचशे रूपये भरून हौसेने
मस्त टुरीस्ट जेलमधे जाईल !

मध्यवर्ती कारागृहाचेे संग्रहालय
संगरेड्डी जिल्हयात झाले,
पैसे भरून टुरीस्ट बघा आता
जेलची हवा खावु लागले !

© शिवाजी सांगळे 🎭

तेलंगणा सरकारने मेडक येथील संगरेड्डी जिल्हयाच्या मध्यवर्ती कारागृहाचे संग्रहालयात रूपांतर करून "फील दी जेल"ची अभिनव संकल्पना सुरू केली आहे.

http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t25569/new/#new

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०१६

पण काहीही म्हणा... वायफाय कटींग


पण काहीही म्हणा...
वायफाय कटींग

जमाना पुरता हल्लीचा
इंटरनेटमय झाला आहे,
कुठे माँल न् स्टेशनवर
वायफायचा ताल आहे !

सत्कार चहावाल्यानं यात
चांगलच डोकं लढवलं,
चहासंगे वायफाय देतांना
शेगावचं नावही वाढवलं!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t25560/new/#new