गुरुवार, ६ जून, २०१९

वेड चहाचे

सकाळी सकाळी हातात चहाचा कप असता, माझा चहा व्यावसायिक शाळा सोबती अविनाश याचा वॉट्स अँटवर मेसेज आला, अर्थात काय असेल मेसेज? आधी तो पाहू की चहा घेवू? अशा द्वंद्वात फसलेला असतांना स्व. वंदना विटणकरांचं  "हा छंद जीवाला लावी पिसें" हे गाणं आठवलं. नेमकं आमच्या सोबत्याचं आडनाव सुद्धा पिसे... हातात चहा, मोबाईलवर त्याचा मेसेज... मग काय सर्व राहिलं बाजूला आणि #वेड_चहाचे या विडंबन गीताची निर्मिती झाली... अर्थात वंदना ताईंची क्षमा मागून...

शुक्रवार, ३१ मे, २०१९

हायकू ४२९-४३१

#हायकू_४३१

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू_४३०
ते अनोळखी
बद्ध लग्न बंधनी
नवी कहाणी २७-०५-२०१९

#हायकू_४२९

टपटप पाऊस


५५५/३१०५२०१९

बुधवार, २९ मे, २०१९

भाव जळाचा

भाव जळाचा

वाहत्या जळासम एकरुप व्हावे
खळाळणे त्याचे मनात रूजवावे

राग लोभ द्वेष सारे ते आतले
होत अलिप्त कडेस सोडून द्यावे

येवो पुढ्यात कोणी कधी कसा
तृष्णा तृषार्ताची शमवित जावे

भाव जळाचा अलिप्ततेचा ठेवा
अनुसरण करण्या प्रयत्ने रहावे

नाते मनाचे सृष्टीची कथा अखंड
मैत्र त्यांचे शिवाशी बंधानी उरावे

© शिवाजी सांगळे 🎭
मो. ९५४५९७६५८९

http://marathikavita.co.in/preranadai-kavita/t31748/new/#new

बेवफ़ा ज़िन्दगी


२९०५२०१९