शुक्रवार, २० मे, २०१६

तारा


तारा …

ताऱ्याची का चूक झाली?
झुगारून ती सारी कक्षा,
एकटाच उतरला तो खाली !

अवकळा का नभी आली?
तारांगण रिते का झाले?
कि नव पोकळी निर्माणली?

उल्का प्रलय होत रहातो
पडझड तर नियम सृष्टीचा
झुगारून देणे, अपवाद होतो !

म्हणतात, तारा तो निखळतो
विलय कि अस्त तो त्याचा?
मात्र जीवन स्वत:चे जगतो !
© शिवाजी सांगळे 🎭
https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t15376/

गुरुवार, १९ मे, २०१६

आरती श्री स्वामींची

!! आरती श्री स्वामींची !!

श्री स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ !
नामतव घेता मात्र
उरे आम्हा जीवनी अर्थ !
मोह दूर सारुनी
करावे देवा जीवन सार्थ !
करता ध्यान, साधना
समजुदे तव नामाचा अर्थ !
दयावी शक्ती, भक्ती
कष्ट जाउनी राहो परमार्थ !
अक्कलकोटी दयावे दर्शन
राहो आम्हा ईतकाच स्वार्थ !
मागणे सकळ शिवाचे
दयावे आम्हा मोक्षाचे तीर्थ !

© शिवाजी सांगळे 🎭
https://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita/!!-!!-15445/

दे धक्का...! मी माल्ल्या...


मी माल्ल्या...

वाटल नव्हतं एवढं
सहज शक्य होईल,
बुडवून बँकाची कर्जे
देशातून पळता येईल !

काय पण लोकांनी
केली मदत मनापासून,
जागले खरच ईमानाला
पहील्याच पेग पासुन !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-22988/new/#new

दे धक्का...! निकाल?

दे धक्का...!

निकाल?

दिलेल्या आमिषांचा
कि वाटलेल्या पैशाचा?
अन् केलेल्या कर्माचा
दिन आज निकालाचा !

कोण कामी येईल
कोण निकामी हाेईल?
भविष्य नेमकं याचं
निकालच ठरवतील !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-23822/new/#new

बुधवार, १८ मे, २०१६

एहसास


फुले वेचीता...



  



-: फुले वेचीता :-

 फुले वेचीता देवासाठी
  मनी एक विचार आला
  दिलेले त्याचे सारे काही
  आपण अर्पितो त्याला !

खरचं माझे माझे म्हणता काय असतं आपल? आपल्याला सतत वाटत कि मी हे केलं, मी ते केल वगैरे पण खरच काय करतो आपण? आपला श्वास सुद्धा कधी आपला उरत नाही. सारं तर त्या इश्वरानेच निर्माण केलेलं आहे, तरीही अहंकारी स्वर्थी माणुस स्वतःला प्रत्येक बाबतीत जोडत असतो, त्याचंच नेहमी नवल वाटतं.वास्तविक आपल्याला आपले षड़रिपु  म्हणजेच काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, द्वेष, मत्सर यांचा त्याग देवापाशी करता आला पाहिजे ते देवाला देवुन त्या बदल्यात त्याच्या कडून प्रेम, वात्सल्य, माया प्राप्त करायला हवी ज्या मुळे आपले जीवन समृद्ध व्हायला -या अर्थाने मदत होईल.


= शिवाजी सांगळे, sangle.su@gmail.com +91 9422779941 & +91 9545976589

मंगळवार, १७ मे, २०१६

संध्याकाळ...!



संध्याकाळ...!


फिरत फिरत समुद्र किना-यावर गेलो, तांबुस पिवळा मावळता सुर्य मला नेहमीच भुरळ घालतो, लाटा आज जरा मोठ्याच होत्या, जमेल तेवढं पुढे गेलो, दगडांवर, भिंतीवर आपटणा-या लाटांचे तुषार छानपैकी उसळुन अंगावर येत होते, त्यांची खारट चव ओठांवर जाणवत होती. सांजवारा पण हलकेच बोचरा होउ लागलेला... पक्षांचे थवे घरट्याच्या ओढीने परतीला निघाले होते, पण असं का वाटत होतं सुर्य अस्ताला जायला आज उशीर करतोय...?
"संध्याकाळ काल जरा जास्तच रेंगाळली,
तीलाही कळलं मला तुझी आठवण आली!"
स्वाभाविक आहे, अश्या रम्य वेळी तीची आठवण येणारच, निसर्गच तो, आपल्याला स्वत:त गुंतवतो हे मात्र सत्य. अशा समुद्र किना-यावरची संध्याकाळ आणि श्यामल काळे ढग जमा होता होता दुरवरून येणारा मातीचा दरवळ येउ लागला कि आपसुक आठवणी जीवंत होऊ लागतात. पावसा सोबत आमचं खुप प्रेमळ नातं आहे, किंबहुना प्रत्येकाच तसं असतंच... मग तो आला तर एकटा कसा येईल? तिला सुद्धा आठवण करून देईल...!
"नक्की ढगांनी केली असेल सरींची पाठवण?
आली असेल का तिलापण माझी आठवण?"
पाऊस पडायला लागला कि सारं कस मस्त, प्लेझंट, वेगळंच हवं हवंस वाटायला लागतं. पावसानं याववं, धुवांधार बरसावं आणि हो, अशा वेळी नेमकी आपल्याकडेच छत्री असावी व तिनं स्वतःची विसरून यावी! किंवा याच्या उलट झालं तरी चालेल, मग सर्वांच्या देखत, स्वतःच्या नकळत तीला सावरत, भिजत घेउन जायचं, पुन्हा दुस-या दिवसासाठी त्याच ओढीनं एकमेकांकडे पहायचं...
"सरींच कायं! त्या येतात धरणीच्या ओढीने
खुपदा झालो आम्ही सुध्दा चिंब जोडीने!"
केव्हा तरी परीस्थिती गडबड करते, तीचं किंवा त्याच नसणं, जास्त बोचरं भासतं, एकटेपणाचं वाटतं, मग मन कशातच रमत नाही, नेमकी ही अवस्था पाहून हळूच कुणीतरी आवाज देतं " , देखो मजनू जा रहा है..." किंवा "हिची तर पार लैला झाली गं" मग उगीच छातीत धडधडायला लागतं, पण चेह-यावर ते न दाखवता चटकन तिथुन सटकायचं. शरीराने पळतो खरं, पण मनाचं काय? ते तर केंव्हाच ट्रांन्स मधे गेलेलं, आठवणींच्या सरीत चिंब भिजत राहीलेलं... दोन्हीकडे तीच परीस्थिती, कुणी कुणाला समजवायचं? पण ते शक्य नसतं उरतं फक्त परस्परांसाठी झुरणं... कधी थेंब थेब अश्रुंचं झरणं...
"कधी चिंब पावसात आठवणींच्या भिजायचं 
सवय लागते मग एकमेकां साठी झुरायचं!"
पाऊस मग दरवर्षी येतच राहतो, ॠतुचक्रा सोबत जीवन चक्र पण चालत रहातं, आता आणखी एक छोटी छत्री सोबत आलेली असते, पावसाची परीभाषा थोडीशी बदलते, बोबडी होऊ लागते... पाऊस येतच राहतो...
मग येते अशीच एक संध्याकाळ, आयुष्याची. दोहोंपैकी कुणीतरी एकजण  पहीला नंबर लावतो, मोकळा होतो... पुन्हा नवा भुतकाळ दुस-याला गोठवतो. आराम खुर्चीत बसुन आठवणींचे झोके घेत रहातो, डोळ्यांच्या कडा ओल्या होउन सुकून जात असतात... आपोआप डुलकी लागते, शरीराच्या थकव्याने व मनाच्या एकटेपणाने. इतक्यात नात किंवा नातू खुर्ची हलवतात, मग सारी मरगळ दूर होते व त्या बाल रूपा सोबत परत एक संध्याकाळ स्मरू लागते... मनात रेंगाळत राहते.

= शिवाजी सांगळे,बदलापूर, +९१ ९४२२७७९९४१ & +९१ ९५४५९७६५८९ sangle.su@gmail.com
Marathi Lekh, November 01, 2015,01:25:08 PM http://marathikavita.co.in/marathi-lekh/!-21284/new/#new

 

दे धक्का...! पार्ट टाईम

दे धक्का...!

पार्ट टाईम


कायदा सुव्यवस्था खालावली
इतपत बोलणं ठिक आहे,
गृहमंत्रीपद द्यावे सक्षम नेत्याकडे
सुचविण्यात काय गोम आहे ?

राजकारण काहींना तर नक्कीच
फुल टायमाचं काम आहे,
प्रसिद्धीच्या झोतात राहणार्‍यांना
हा पार्ट टाईम जाँब आहे !

© शिवाजी सांगळे 🎭

http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-23801/new/#new

सोमवार, १६ मे, २०१६

शाम कहती है...

शाम कहती है...

मुझे इंतजार रात का,
किरणोंको समेंटती जाऊं मै,
उसकि आगोश मे...
सहि है तपिश सुरज कि,
अब चंद्रमा सहलाएेगा मुझे
सुनाकर रातकी लोरीयाँ!

© शिवाजी सांगळे 🎭

रविवार, १५ मे, २०१६

माझी मुंबई... आठवणीतली आणि आजची....

“ माझी मुंबई “

     मुंबई शहर, तुमच, आमचं, सगळ्याच! ज्यांनी पाहिलं नाही त्यांच्या स्वप्नातलं! जगातील प्रत्येकाला वाटत, एकदा तरी इथ याव, इथले लोकं, बस, ट्रेनची गर्दी पहावी! वडापाव, कटींग चहाची चव घ्यावी! अविरत धावणार, कधीही न थांबणारं, जगातील सांर काहि एकवटलेल शहर म्हणून याचं सर्वांना आकर्षण, आणि हिच मुंबईची कालपर्यंतची ओळख.

     पण आता, मुंबईत खुप बदल झाले, बरेच चढउतार आले! पिढी बदलली, लोकहि बदलले, मुंबईने जुन्या नव्यांना सामावून घेतलं, आपलसं केलं, त्यामुळे मुंबई स्वत: बदलली. आता मुंबईत आहेत उंच गगनचुंबी ईमारती, सतत वाहणारे उड्डाणपूल, गर्दीने तुडूंब भरलेल्या बसेस, लोकल ट्रेन्स, आणि धावणारी, दडपणाखाली जगणारी माणसं.

     पूर्वी इथ मिल होत्या, कारखाने होते. पण आता... ते सारं गेलं, उरलेत ते फक्त त्यांचे भग्न अवशेष! त्यात होताहेत अपराध आणि सामुहिक बलात्कार. अशी नवी ओळख आता मुंबईची होवू लागली आहे. पण, आजहि खुप लोकांना जुन्या मुंबईची आठवण आहे, ज्याकाळी कशाची भीती नव्हती, एकमेकांची काळजी होती, दुसऱ्यासाठी जगणं होतं, बरचस आनंदाचं होत, सुखाच होतं, आपलेपणाच होत...! त्याच आठवणीचा हा एक काव्यात्मक प्रवास.......“ माझी मुंबई “
A poetic Journey of Mumbai…


माझी मुंबई ...

दुध केंद्रावर बाटल्यांची,
नाक्यावर पेपरवाल्यांची
शाळेत जाणाऱ्या मुलांची,
पाळीवाल्या कामगारांची
गर्दी असायची तेंव्हा मुंबईत !

मुलांना मास्तरांची,
भुरटयांना पोलिसाची,
उचल्यांना दुकानदारांची,
माणसाला देवधर्माची,
भीती असायची तेंव्हा मुंबईत !

दुपार नंतर केंव्हाही,
आंटीच्या अड्ड्यावर पिणाऱ्याची,
चौपाटीवर मालिश वाल्यांची,
रस्त्यावर गंडेरी वाल्यांची,
गर्दी असायची तेंव्हा मुंबईत !

संध्याकाळी चाकरमान्याची,
त्यानंतर उशीरा शौकीनाची,
चौका, वाड्यांमधून खेळांची,
रात्री पोलिसाच्या गस्तीची,
गर्दी असायची तेंव्हा मुंबईत !

© शिवाजी सांगळे