सोमवार, १४ नोव्हेंबर, २०१६

निखारा

निखारा

सोसलेला क्षण सहवासाचा
असेल मनात कोंडलेला !

आळवु नकोस तीच रागदारी
छेडून त्याच त्या सुराला !

ऐकू नको का ह्रदयाचं काही?
घाव अजून ताजा कोरलेला !

फुंकर मारलीच तर, पेटेल
निखारा राखेत निजलेला !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t26117/new/#new

वाट पलीकडची

वाट पलीकडची

क्षण क्षण स्मृतींचे थबकले
तूझ्या भेटी वाचून

जागी गोठले दव डोळ्यातले
ओघळण्या वाचून

कोरेच राहीले कागद ते सारे
तूझ्या शब्दां वाचून

ओसाड वाट नदि पलीकडची
एकटी चाहूली वाचून

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t26104/new/#new

रविवार, १३ नोव्हेंबर, २०१६

शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०१६

माझी कविता

माझी कविता

कधी शेतात राबते
कधी आकाशी विहरते
कधी एकांतात बोलते
कधी स्वप्नवत जगते
कधी वास्तव सांगते
कधी तलवार तळपते
कधी हळूवार होते
कधी भक्तीत नाहते
कधी मायेत रमते
कधी बलिश होते
कधी विडंबण करते
खुपदा प्रेमात असते
फक्त ती माझी कविता

© शिवाजी सांगळे 🎭

म्हणुन गेला कवी...

म्हणुन गेला कवी...

चर्चा  होती लोकांत
होवो नये माझा कवी,
प्रेमात तुझ्या सखे गं
म्हणुन गेला एक कवी!

कविते साठी म्हटलं
लिहावी एकदं कविता,
पण काय करावं मी?
रूसली होती कविता!

समजावलं, मनवलं
तरी ऐके ना कविता,
सांगा तूम्हीच आता
पटली का कविता?

© शिवाजी सांगळे 🎭