रविवार, २६ नोव्हेंबर, २०२३
म्हटलं तर २६११२०२३ YQ ०८:३२:२५
शनिवार, १८ नोव्हेंबर, २०२३
चाहूल थंडीची
चाहूल थंडीच
लागता चाहूल थंडीची मन धुक्यात न्हाऊन जाते
रस्ते न् गल्लोगल्ली उब शेकोटीची जाणवू लागते
दिसती फिरून, घरोघरी उबदार वस्त्रे ठेवणीतली
चौकात स्वेटर मफलर शालींची रंगीत गर्दी दिसते
हलकेच ऋतू मनामनावर मग अद्भुत जादू करतो
गुंतले असो मन कैफात कोण्या तेही गुलाबी होते
अल्पावधी ठरते आयुष्य नेमके मलमली धुक्याचे
सहस्रश्मींनी हळूहळू जसे, नभांगण व्यापू लागते
फिरून एक नवे चक्र फिरते, सृष्टीचा नुर बदलतो
पानगळ सरू होता हलके, शिशिराची चाहूल होते
https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t45069/new/#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
ही दुनिया
मंगळवार, १४ नोव्हेंबर, २०२३
रविवार, १२ नोव्हेंबर, २०२३
मंगळवार, १० ऑक्टोबर, २०२३
माणूस
माणूस
शोधतोय अजूनही मला कळलेला माणूस
गर्दीत नाही भोवती, हवा नसलेला माणूस
थोडेफार काही जरा साध्य केले इथे कुणी
वागतो,जणू परग्रहावरून आलेला माणूस
फसगत होते जाणण्यात माणसास तरीही
सर्वात वेगळा दिसतो कष्ट केलेला माणूस
"शिक्षण म्हणजे वाघीणीचे दूध" सत्य खरे
म्हणूनच सगळ्यात श्रेष्ठ शिकलेला माणूस
वर वर जरी, चढविलेत पोशाख कोणतेही
प्रसंगी कळतो खरा त्यात दडलेला माणूस
वाढते आहे आयुष्य आपल्या गतीने, मात्र
शोधतोय अजून मी हवा असलेला माणूस
ईतर कविता, October 10, 2023, 02:40:07 PM (14:40 YQ)
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
शनिवार, ७ ऑक्टोबर, २०२३
प्रचार जोर
प्रचार जोर
शक्तीप्रदर्शनाचा जोर आताशा
खरोखरच बेफामपणे वाढत आहे?
जे.सी.बी., डंपर देखील हल्ली
राजरोसपणे प्रचारात वापरत आहे!
शेतकऱ्यांना भाव नसतांना
वजनदार हारांनी काय सिध्द होते?
आपलं म्हटलं, म्हणून खरं का
आपलं सरकार, आपलं केव्हा होते?
वात्रटिका, October 07, 2023, 07:41:03 PM (YQ)
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
रविवार, १ ऑक्टोबर, २०२३
हाताची घडी ०११०२०२३ YQ ११:१०
हाताची घडी
अपयशाच्या डोंगरात...अपेक्षांची होडी
चाचपडणाऱ्या जगण्याची वेगळी गोडी
अंधूक प्रकाश कधी लख्ख काळोखात
चढ उतार नित्याचा त्यास सोवळी शिडी
लक्षवेधी अशी, सारीच का येथली चित्रे
नेहमीच लावतात, आभासी लाडीगोडी
सगळ्यांनाच एक सुखदुःखाचा किनारा
ऐपतीप्रमाणे घेतो, प्रत्येकजण येथे उडी
सारेच का ठरलेले? नियतीचे सर्व फासे
म्हणून का जगावे घालून हाताची घडी?
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३
भावना निनांद ३००९२०२३ YQ १३:०९
भावना निनांद
अनभिज्ञ असता कुणी परस्पर
ओढ शब्दांची जोडते शब्दांना
तरंग प्रवाहात भावभावनांच्या
चढतेच रंगत खरोखर शब्दांना
शब्दांनीच सहजच जुळते नाते
शब्दांनीच आयुष्य खुलत जाते
मोहमायेत या जगात आभासी
अन्यथा कोण कुणाशी बोलते?
साधेच असते देणे घेणे शब्दांचे
अव्याहत नियम साद प्रतिसाद
जुळता नाळ कधी आपसूक ती
मनात गुंजे नित्य भावनानिनांद
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९