माणूस
शोधतोय अजूनही मला कळलेला माणूस
गर्दीत नाही भोवती, हवा नसलेला माणूस
थोडेफार काही जरा साध्य केले इथे कुणी
वागतो,जणू परग्रहावरून आलेला माणूस
फसगत होते जाणण्यात माणसास तरीही
सर्वात वेगळा दिसतो कष्ट केलेला माणूस
"शिक्षण म्हणजे वाघीणीचे दूध" सत्य खरे
म्हणूनच सगळ्यात श्रेष्ठ शिकलेला माणूस
वर वर जरी, चढविलेत पोशाख कोणतेही
प्रसंगी कळतो खरा त्यात दडलेला माणूस
वाढते आहे आयुष्य आपल्या गतीने, मात्र
शोधतोय अजून मी हवा असलेला माणूस
ईतर कविता, October 10, 2023, 02:40:07 PM (14:40 YQ)
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा