ही दुनिया
ही सारी दुनिया कुणाला रे कळली गड्या?
जो तो शहाणा येथे, समजून तु रे घे वेड्या
वागतो मर्जीने स्वतःच्या कुणी दुसऱ्याच्या
कमवून स्वैर मार्गी बांधती माडीवर माड्या
कोण मोजतोय वाढली लोकसंख्या एवढी
ताळमेळ बिघडवून शहरात दौडती गाड्या
बंधने पाळावी कुणी कशी, सारेच सांगती
समजेना कुणास जोवर पडत नाही छड्या
म्हणून सांगतो नाही कळली दुनिया कुणा
जो तो शहाणा येथे, समजून तु रे घे वेड्या
https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t45051/new/#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा