गुरुवार, ९ जून, २०१६

दे धक्का...! नाव न् वाव

दे धक्का...!
नाव न् वाव

शेक्सपियर म्हणाला
नावात सांगा काय आहे ?
नावातच सर्व काही
म्हणुन योजनेला भाव आहे!

स्टाँक जुना असला तरी
पँकिंग मात्र हे नविन आहे,
माल पोहचो ना पोहचो
कार्याला आमच्या वाव आहे!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24128/new/#new

बुधवार, ८ जून, २०१६

दे धक्का...! अदृष्य नशा


दे धक्का...!
अदृष्य नशा

दृष्यांवर केवळ कात्री चालवून
खरे वास्तव बदलणार नाही,
सत्य स्विकारल्या शिवाय तरी
परिस्थितीत बदल होणार नाही !

पंजाब मधील ड्रग्जची नशा
कशी बशी थांबवता येईल,
जातीवाद व धर्माच्या नशेला
देशभरात कसे आवरता येईल?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24110/new/#new

मंगळवार, ७ जून, २०१६

दे धक्का...! संवर्धन

दे धक्का...!
संवर्धन

रायगड किल्ला व परिसराच्या
विकासाची घोषणा झाली आहे,
पाचशे कोटीच्या आराखड्यास
जागेवरच मंजुरीही दिली आहे !

शिवराज्याभिषेक दिना पुरती
डागडूजी आता व्हायला नको,
रायगडावर जी केली घोषणा
प्रसिध्दी पुरती उरायला नको !

© शिवाजी सांगळे 🎭

http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24090/new/#new 

सोमवार, ६ जून, २०१६

दे धक्का...! दोष कुणाचा?


दे धक्का...!
दोष कुणाचा?

दोष सोयीच्या रस्त्याचा
कि सदोष वाहनांचा ?
म्हणावा खेळ दैवाचा
कि अज्ञानी चालकांचा?

यंत्रणेला तर आम्ही
नेहमीच टार्गेट करतो,
वाहने चालवितांना मात्र
स्वतःच्या चुका विसरतो !

© शिवाजी सांगळे 🎭

http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24074/new/#new

रविवार, ५ जून, २०१६

दे धक्का...! झाडे लावू


दे धक्का...!
झाडे लावू

बोलाची कढी अन्
बोलाचाच भात होतो,
शिळ्या कढीला फिरून
पुन्हा पुन्हा ऊत येतो !

दरवर्षी झाडे लावू
म्हणत आदेश निघतो,
झाडे लावण्या पुर्वीच
पावसाळा निघुन जातो !

© शिवाजी सांगळे 🎭

http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24067/new/#new

हे सृष्टी...

आज जगतिक पर्यावरण दिन, 
एक मागणे सृष्टी कडे...

हरीत वसुंधरा

जागतिक पर्यावरण दिना निमित्त एक जुनी कविता...

हरीत वसुंधरा

वादळा रे तू असा कसा ?
नेलास मोडुनी डाव सारा !
निवारा पक्षांचा, तू पाडला
वाटसरूंचा सावली सहारा !!

छेडले आधी आम्हीच निसर्गा
देवुनी पोकळ प्रगतीचा नारा !
केले कत्तल झाडांना रस्त्यां
वाढवुनी रूदीकरणाचा पसारा !!

पेरायची बीजे नवी कोणती
ठरविण्या जातो वेळ सारा !
बिघडुनी सारा तोल सृष्टीचा
उरतो मानव दीन बिचारा !!

एक रोप रूजवुनी घ्यावे
पुण्य थोडे जगता संसारा !
अनंत रूपे आशिर्वाद देता
बहरेल ही हरीत वसुंधरा !!

© शिवाजी सांगळे 🎭

दे धक्का...! एका माळेचे मणी


दे धक्का...!
एका माळेचे मणी

जाणे येणे नाही आपल्या हातीे
तोच तर सृष्टीचा नियम असतो,
राजकारणात थोडं वेगळ असतं
अनेकांसाठी एक काढला जातो!

कालचा मित्र आज होतो शत्रु, न्
कालचा दुश्मन आज मित्र होतो,
इथे सगळेच मणी एका माळेचे
सत्ते साठी कुणी कुणाचा नसतो!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24058/new/#new

शनिवार, ४ जून, २०१६

दे धक्का...! कोरडा आव


दे धक्का...!
कोरडा आव

फुलाची हर एक पाकळी
स्वः अस्तित्वाने जगत असते,
दोष द्यायचा ठरवलचं तर
कळी, पाकळी खुडावी लागते !

फुला फुलात कमी अधिक
अाप पर भाव नक्की असतो,
कायम पाण्यात राहून सुध्दा
कोरडे राहण्याचा आव असतो !

© शिवाजी सांगळे 🎭

http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24051/new/#new

वारी