रविवार, १९ जून, २०१६

तृप्ती

तृप्ती

सरी अभंग असा बरसावा
कण कण धरेचा भिजावा
जगणारा जीव प्रत्येक इथं
तृप्त होउन सुखी व्हावा !

© शिव 🎭 

दे धक्का...! दोस्ताना

दे धक्का...!
दोस्ताना

तू मार, मी त्यांना चुचकारतो
असचं तर सद्या सुरू आहे
निवणुकांच्या तोंडावर तरी
असं बोलण्याची गरज आहे!

जुना दोस्ताना लक्षात घेता
फुले सुध्दा उधळावी लागणार,
अस्तित्व दाखविण्या साठी
यांनाही तीर सोडावे लागणार!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24230/new/#new

शुक्रवार, १७ जून, २०१६

दे धक्का...! पदाची पात्रता


दे धक्का...!
पदाची पात्रता

राष्ट्रपती होण्यासाठी
मी नाही योग्यतेचा, न्
बच्चनजीनी थांबवला
विषय राष्ट्रपतीपदाचा !

थट्टामस्करीत का कुणी
उगीच काही बोलतो?
दुधाने पोळलेला तेंव्हा
ताकही फुंकुनच पितो !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24212/new/#new

गुरुवार, १६ जून, २०१६

सरींनो


कुठे आहेस तू?


दे धक्का...! आत्मविश्वास


दे धक्का...!
आत्मविश्वास

कलमापण अहवालावर
शुभेच्छासह फोटो छापला,
त्याचा हास्यास्पद खुलासा
शिक्षणमंत्र्यानी लगेच केला!

फोटो पाहून प्रेरणेचे दिवस
कधीचे टळून गेले कि राव,
जाहिराती साठी आजकाल
बर्‍याच क्षेत्रात आहे ना वाव !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24196/new/#new

क्षण गोठलेला


क्षण गोठलेला

धुके हे दाटले
क्षण ही गोठले
तूझ्या मनी का
हे ची स्मरले?

तरू ही लाजला
दवांत नाहला
एकांत कसा हा
भेटी आसुसला

स्तब्ध ईमारती
अवती भोवती
प्रेमातुर आपणां
हळूच पाहती

भाव दाटलेला
भेटीत गोठलेला
स्मरू नित्य हा
क्षण अनुभवलेला

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t24201/new/#new

बुधवार, १५ जून, २०१६

दे धक्का...! प्रेमळ विनंती


दे धक्का...!
प्रेमळ विनंती

आजकाल राजकारणी
कात टाकू लागलेत,
पांढर्‍या कपड्या सह
रंगीतही वापरू लागलेत!

कपड्या सोबत हल्ली
भाषा पण बदलू लागले,
प्रश्न विचारायच्या अगोदर
डिअर सुद्धा म्हणू लागले!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24182/new/#new

मंगळवार, १४ जून, २०१६

दे धक्का...! जात्यातुन सुपात


दे धक्का...!
जात्यातुन सुपात

कधी काळी जात्यात होते
तेच सारे आज सुपात आहेत,
आरोप व प्रत्यरोप करून
पुरती मजा करून घेत आहेत!

सत्ताधार्‍यांना रोज नवे
घोटाळे आता भोवणार आहे,
विरोधातील लोकांनी तशी
ताजी भविष्यवाणी केली आहे!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24167/new/#new