रविवार, २६ जून, २०१६

तुझे गीत गाऊ दे...

तुझे गीत गाऊ दे...

दर वर्षी तु येतोस, सर्वांना सुखावतोस, पण मागील काही वर्षांपासून तू जरा रूसलास तरीही नको तेव्हा बरसलास. का रे तू असा वागलास? तुला माहीत आहे तुझ्यावाचून आम्हीच काय, सारी सृष्टी काहीच करू शकत नाही.

पृथ्वीवरील सारे जीव तूझ्या वाचून शुन्य आहेत, तूझ्या अमृतमयी थेंबानी सारी धरा शहारून येते, तीचं स्वतःचं रूप तुझ्या केवळ जाणिवेने बदलून जातं, पशु,पक्षी सारं काही नवसंजीवनी मिळाल्या सारखे ताजे तवाने होउन जातात. काल तुझं अस्तित्व जाणवलं, खिडकीत येउन तुला नमस्कार केला, मनातुन प्रार्थना केली कि "बाबा रे यंदा तु थोडासा लेट झालासं, काही हरकत नाही, तसा तु लहरी नाहीस, पण आमच्याकडचे हवामान खात्याचे जे लोक आहेत ना, त्यांचे अंदाज मात्र नेहमी चुकिचेच ठरतात, आता हे तुला आणि त्यांनाच ठावूक, कि कोण कुणाची फिरकी घेतयं ते? असो, तरी यंदा तुला अशी नम्र विनंती कि जरा मन मोकळा ये, आणि सर्व दूर ये, नाही तर काही ठिकाणी खुप दिवस तु मुक्काम करतोस, पार दैना होते रे सार्‍यांची, आणि ज्या ठिकाणी नाही येत त्यांची पण अवस्था चांगली नसते रे, समजुन उमजुन ये जरा, कारण तुला माहितच आहे कि तुझ्या शिवाय कुणाचेच पान हलणार नाही.

मला माहित आहे, मी तुला एवढं सागळं सांगतोय तरीही आमच्या पण काही चुका आम्हाला मान्य करायलाच हव्यात, आम्ही तुझा, तुझ्या निसर्गाचा सारा ढाचाच बदलून टाकला, नको इतकी जंगलतोड केली, शहरीकरणाच्या नावा खाली डोंगर फोडून तुझ्या हक्काचा थांबा हिरावून घेतला, तू जर थांबलाच नाहीस तर बरसणार कसा? याचं सुध्दा आम्हा मुर्खांना भान राहिलं नाही.
नुसत्या ईमारती बांधत राहीलो, त्या साठी अमाप झाडे तोडली, पर्यायाने जमिनीची धुप होउन तुझे जमा होणारे पाणी सुद्धा समुद्राकडे निघुन जाउ लागले, परिणाम स्वरूपी माळीन, ॠषीकेश वगैरे सारख्या घटना घडून गावेच्या गावे वाहून, गायब होउन गेली, म्हणजे तु व्यवस्थित बरसुन सुद्धा आमचे नियोजन नसल्या मुळे व कळत असुन वळत नसल्या मुळे, तुलाच दोषी ठरवायची खोड आम्हाला लागली. हे वरूण राजा आमची हि कृत्ये एकदा विसरून आम्हाला क्षमा कर.

यंदा येउन सारा जुना हिशोब चुकता कर आणि सार्‍या जगताला शांत कर, पुन्हा एकदा हि धरणी सुजलांम् सुफलांम् होउ दे, सगळ्यानी आनंदाने तुझे गीत गाउ दे.

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t24323/new/#new

शनिवार, २५ जून, २०१६

दे धक्का...! धमकी सत्र


दे धक्का...!
धमकी सत्र

जो उठतो, तो धमकी देतो
का म्हणुन कुणी ऐकुन घेतो?
मैत्री मधे पण तेच सुरू आहे
पक्ष कुणालाही पाठीशी घालतो?

असंच जरा काही होत राहिलं
तर "अच्छे" दिन नक्की येणार,
कुणाच्याही बेताल बोलण्याला
कसं अन् कधी आवरतं घेणार?

© शिवाजी सांगळे 🎭

http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24307/new/#new

दे धक्का...! शिक्षणाचा भार


दे धक्का...!
शिक्षणाचा भार

शिक्षणा पेक्षा आजकाल
नोकर्‍यांचा दर्जा वाढला,
भार वाहक पदा साठी
एम् फील पायरी चढला !

असं वाटू लागलयं
आता नोकरी महाग झाली,
न् उच्च शिक्षण घेउन
पोरं बेकारच राहू लागली?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24304/new/#new

गुरुवार, २३ जून, २०१६

दे धक्का...! टाईम टेबल


दे धक्का...!
टाईम टेबल

थोड्याश्या पावसाने
दर वर्षी नेमकं असचं होतं,
न चुकता लोकलचं
टाईम टेबल नक्की बिघडतं !

नंतर चौकश्या वगैरे
सराईत पणे केल्या जातात,
प्रवाशांनी सोसलेल्या
त्रासाची भरपाई का देतात?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24284/new/#new

दे धक्का...! सर्वज्ञानी स्वामी


दे धक्का...!
सर्वज्ञानी स्वामी

निशाना साधायचा एकावर
करायचा हल्ला दुसर्‍यावर,
कुणीही सोडेल पद आपले
डाँ. स्वामींनी ठरविल्यावर !

रघुराम राजन झाले आधी, आता
अरविंद सुब्रमण्यम यांचीे वेळ आहे,
हात झटकून त्वरीत म्हणे भाजपा
हे स्वामींचे वैयक्तिक मत आहे !

७६ जणांची यादी गोळा करून
भाजपाने आता एकच करावे,
पंतप्रधानांना पायउतार व्हा म्हणत
डाँ.स्वामींनाच पंतप्रधान करावे !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24280/new/#new

दे धक्का...! काळी पिवळी


दे धक्का...!
काळी पिवळी

मुंबईचे टँक्सी चालक झाले सावध
न् टँक्सीं सोबत आले ना रस्त्यावर,
का वेळ आली विचार करण्याची
ओला व उबरने सेवा पुरवल्यावर?

चुका होतात जेंव्हा स्वतः कडून
नक्की दुसरा जातो फायदा घेउन,
आहे अद्याप वेळ तूमच्याच हाती
पहा प्रवाशांना चांगली सेवा देउन !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24263/new/#new

मंगळवार, २१ जून, २०१६

दे धक्का...! सत्ता संसार


दे धक्का...!
सत्ता संसार

स्वबळावर लढायचे म्हटले तरी
दोघांच्या मनी आहे थोडी भिती,
नको नको म्हणता तयार आहेत
अटी व शर्तीं वर करायला युती !

राजकारणात आता रूसवे फुगवे
ही तर नित्याची बाब झाली आहे,
एकमेकां सोबत नाही नांदले तर
सत्तेचा संसार का चालणार आहे?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24258/new/#new

रविवार, १९ जून, २०१६

अर्थ पाश

अर्थ पाश

जगण्या साठी "अर्थ" शोधता
वण वण फिरून प्रवास केला,
अर्थची तो ठरला निरर्थ अंती
सोडून सारे तो एकटाच गेला!

उरलेत केवळ पाश स्मृतींचे
कालौघात तेही विरून जातील,
सोहळे कसे, मरणाचे जगलेले
चविने का ते चघळले जातील?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/gambhir-kavita/t24243/new/#new

मी, ती आणि तो... पाऊस


ढग दाटलेले...