बुधवार, २९ जून, २०१६
दे धक्का...! पुळका
दे धक्का...!
पुळका
मैत्रीचीच भाषा भारताने
आजपर्यंत खुपदा केली !
पाहून पाकिस्तानी कुरापत
तेंव्हा यांची वाचा बसली ?
पाक छायाचित्रकारांना
वार्तालापासाठी घेउन आले !
न् पुन्हा सुधीन्द्र कुलकर्णी
सेनेच्या रडार वर आले !!
दरवेळी हल्ला झाल्यावर
कुलकर्णी असंच करतात !
पुळका घेत पाकिस्तानचा
सेने कडून बोलणी खातात !!
© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24352/new/#new
मंगळवार, २८ जून, २०१६
दे धक्का...! रस्त्यावर वाद
टिपटीप पाणी...
टिपटीप पाणी...
रात्रभर पावसाचीटिपटीप सुरू होती...
मी आठवणीं, मोकळ्या करीत होतो...
तीच छत्री काढुन मी उघड बंद केली
तु सुध्दा रेनकोटची घडी उगा विस्कटली
वॉलेट फाटकं मी पुन्हा पुन्हा कुरवाळलं
सुकल्या गजरयातील फुल, तु ही गोंजारलं
थेबां सोबत मी अश्रुंना मोकळी वाट दिली
अस्पष्ट हुंदक्यांनी त्यानां तु पण साथ केली
रात्रभर पावसाची टिपटीप सुरू होती...
मी आठवणीं, मोकळया करीत होतो...
रात्रभर ब-याच आठवणी गोळा झाल्या
रात्रभर सा-या पाण्यात सोडीत होतो...
रात्रभर घेउन थेंब थेंब अंगी भिजलो
रात्रभर गात्रनं गात्र चिंब करीत होतो...
रात्रभर शुष्क नात्यांना ओलावित होतो...

सोमवार, २७ जून, २०१६
दे धक्का...! पाटर्यां व अत्याचार
रविवार, २६ जून, २०१६
दे धक्का...! स्मार्ट श्रेय वाद
दे धक्का...!
स्मार्ट श्रेय वाद
सगळ्यांना हल्ली वाटतंय
देशातील हर एक सिटी
एकदम स्मार्ट व्हायला हवी,
असता सिटी स्मार्ट आधी
आढेवेढे न घेता, कार्याची
पावती त्यांना द्यायला हवी!
मित्र पक्षासह, सर्वपक्षीय
बहिष्कार अन् काळे झेंडे
पाहण्याची वेळ का यावी?
© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24312/new/#new
तुझे गीत गाऊ दे...
तुझे गीत गाऊ दे...
दर वर्षी तु येतोस, सर्वांना सुखावतोस, पण मागील काही वर्षांपासून तू जरा रूसलास तरीही नको तेव्हा बरसलास. का रे तू असा वागलास? तुला माहीत आहे तुझ्यावाचून आम्हीच काय, सारी सृष्टी काहीच करू शकत नाही.
पृथ्वीवरील सारे जीव तूझ्या वाचून शुन्य आहेत, तूझ्या अमृतमयी थेंबानी सारी धरा शहारून येते, तीचं स्वतःचं रूप तुझ्या केवळ जाणिवेने बदलून जातं, पशु,पक्षी सारं काही नवसंजीवनी मिळाल्या सारखे ताजे तवाने होउन जातात. काल तुझं अस्तित्व जाणवलं, खिडकीत येउन तुला नमस्कार केला, मनातुन प्रार्थना केली कि "बाबा रे यंदा तु थोडासा लेट झालासं, काही हरकत नाही, तसा तु लहरी नाहीस, पण आमच्याकडचे हवामान खात्याचे जे लोक आहेत ना, त्यांचे अंदाज मात्र नेहमी चुकिचेच ठरतात, आता हे तुला आणि त्यांनाच ठावूक, कि कोण कुणाची फिरकी घेतयं ते? असो, तरी यंदा तुला अशी नम्र विनंती कि जरा मन मोकळा ये, आणि सर्व दूर ये, नाही तर काही ठिकाणी खुप दिवस तु मुक्काम करतोस, पार दैना होते रे सार्यांची, आणि ज्या ठिकाणी नाही येत त्यांची पण अवस्था चांगली नसते रे, समजुन उमजुन ये जरा, कारण तुला माहितच आहे कि तुझ्या शिवाय कुणाचेच पान हलणार नाही.
मला माहित आहे, मी तुला एवढं सागळं सांगतोय तरीही आमच्या पण काही चुका आम्हाला मान्य करायलाच हव्यात, आम्ही तुझा, तुझ्या निसर्गाचा सारा ढाचाच बदलून टाकला, नको इतकी जंगलतोड केली, शहरीकरणाच्या नावा खाली डोंगर फोडून तुझ्या हक्काचा थांबा हिरावून घेतला, तू जर थांबलाच नाहीस तर बरसणार कसा? याचं सुध्दा आम्हा मुर्खांना भान राहिलं नाही.
नुसत्या ईमारती बांधत राहीलो, त्या साठी अमाप झाडे तोडली, पर्यायाने जमिनीची धुप होउन तुझे जमा होणारे पाणी सुद्धा समुद्राकडे निघुन जाउ लागले, परिणाम स्वरूपी माळीन, ॠषीकेश वगैरे सारख्या घटना घडून गावेच्या गावे वाहून, गायब होउन गेली, म्हणजे तु व्यवस्थित बरसुन सुद्धा आमचे नियोजन नसल्या मुळे व कळत असुन वळत नसल्या मुळे, तुलाच दोषी ठरवायची खोड आम्हाला लागली. हे वरूण राजा आमची हि कृत्ये एकदा विसरून आम्हाला क्षमा कर.
यंदा येउन सारा जुना हिशोब चुकता कर आणि सार्या जगताला शांत कर, पुन्हा एकदा हि धरणी सुजलांम् सुफलांम् होउ दे, सगळ्यानी आनंदाने तुझे गीत गाउ दे.
© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t24323/new/#new

शनिवार, २५ जून, २०१६
दे धक्का...! धमकी सत्र
दे धक्का...!
धमकी सत्र
जो उठतो, तो धमकी देतो
का म्हणुन कुणी ऐकुन घेतो?
मैत्री मधे पण तेच सुरू आहे
पक्ष कुणालाही पाठीशी घालतो?
असंच जरा काही होत राहिलं
तर "अच्छे" दिन नक्की येणार,
कुणाच्याही बेताल बोलण्याला
कसं अन् कधी आवरतं घेणार?
© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24307/new/#new
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)