बुधवार, ६ जुलै, २०१६

नशा धुंदीची

नशा धुंदीची

सरता पहाट जशी दवाची ओलेती
पांघरली  दुलयी फुलांनी धुक्याची

ओल्या कुंतला तुझ्या स्पर्श होता
सुगंधीत मग चढे ती नशा धुंदीची

नेत्रात दाटलेलेे अवखळ भाव ते
व्यक्त करते भावना तुज प्रेमाची

सहवास हवा जो हवासा आपला
देईल अनुभुती परमोच्च सुखाची

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-shrungarik-kavita/t24434/new/#new

मंगळवार, ५ जुलै, २०१६

दे धक्का...! आतंकवाद


दे धक्का...!
आतंकवाद

अतिरेक्यांना खरचं
कोणता धर्म नसतो,
पंथ वादातून केवळ
हल्ला करीत असतो !

हल्ले करून नक्की
काय साध्य होणार?
निष्पापांचे बळी घेउन, का
मुडद्यांवर राज्य करणार?

© शिवाजी सांगळे 🎭

http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24475/new/#new

मी बिचारा...


सोमवार, ४ जुलै, २०१६

दे धक्का...! गोविंदा रे गोपाळा



दे धक्का...!
गोविंदा रे गोपाळा

पारंपारीक दहिहंडीला
यंदा वयाची अट नाही,
म्हणुन जास्त थरांचा हट्ट
कुणीही करायचा नाही !

गोविंदा खेळा, खेळ म्हणुन
तीथे स्पर्धा कधी लावू नका,
खेळतात सारी लहान थोर
होईल ईजा अस खेळू नका!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24467/new/#new

रविवार, ३ जुलै, २०१६

निळ्या अंबरी


दे धक्का...! देवाचा पैसा


दे धक्का...!
देवाचा पैसा

देवाला पैसा वाहून
देव का कधी पावतो?
श्रध्देने वाहिलेला पैसा
गुपचुप उंदिर कुरतडतो!

देवालाही नकोसा पैसा
पहा असा वाया जातो,
सत्कार्मी जर दिला पैसा
तो देशासाठी वापरता येतो!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24435/new/#new

शनिवार, २ जुलै, २०१६

रत्नमाला...


दे धक्का...! मैत्री दाखवु या !


दे धक्का...!
मैत्री दाखवु या !

एकत्र जोडीन जावु या
अन् वृक्षारोपण करू या,
भांडणं सुध्दा करूनी
जनतेला मैत्री दाखवु या !

कधी तुझा थाट मोठा
करीन मग मी हट्ट खोटा,
एकमेका सांभाळुन घेउया,
अन् जनतेला मैत्री दाखवु या !

रूसलोच मी जरी कधी
गोष्ट असेल तेंव्हा साधी,
लाडीगोडीनं प्रश्न सोडवू या,
अन् जनतेला मैत्री दाखवु या !

पाचवर्षे सत्ता टिकवू
राज्यामधे सोनं पिकवु
प्रगतीची शिखरे गाठु या,
अन् जनतेला मैत्री दाखवु या !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-!-24413/new/#new

दे धक्का...! लैगिकतेचे डाव


दे धक्का...!
लैगिकतेचे डाव

शिक्षकांना आदर्श मानण्याची
वेळ कधीच गेली ना राव,
ज्ञानदानाच्या क्षेत्रातलेच, आता
खेळू लागले लैगिकतेचे डाव!

भर चौकात नागवे करून
मारणे नाहीच होणार काफी,
अत्याचारी नराधमांना ह्या
नकोच द्यायला कधी माफी!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24410/new/#new

शुक्रवार, १ जुलै, २०१६

दे धक्का...! वाघाची भेट


दे धक्का...!
वाघाची भेट

डरकाळ्या अन् आरोळ्या झाल्या
आताशा थोडी उसंत आहे,
मनोमिलना साठी मनगुंटीवारांनी
मातोश्रीवर भेट घेतली आहे!

जे पटणार नाही, त्यावर बोलणार
यावर ठाकरे ठाम आहेत,
वाघांची संख्या वाढवायची म्हणुन
वाघाची भेट देत आहेत!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24398/new/#new