गुरुवार, ८ सप्टेंबर, २०१६

मला वाटते.... रीत

रीत

ओथंबुन बरसायची कधी
मेघ बरसल्या सारखी,
असते भरून आता
मळभ दाटल्या सारखी!

बरेच दिवस वाट पाहतोय,
काही खबर नाही तीची...

असच काहीसं झालं कि मनात बरेच विचार दंगा करू लागतात, थोडं शांत होताच, मन उगीच कालच्या व आजच्यात तुलना करायला लागतं....

पुर्वी तश्या सुविधा फार कमी होत्या, तेंव्हा एकमेकास पत्रं पाठवली जायची, अगदिच महत्वाचं वा काही गंभीर बाब असलीच तर ट्रंककाँल करावा लागत असे, नंतर नंबर टेलीफोनचा, तरी कारणापरत्वे कधी तरी फोन करायला मिळायचा, हातातून सुटत नसे फोन बर्‍याचदा तेंव्हा, पण हल्ली चित्र पार पालटलयं, प्रत्येकाच्या हातात मोबाईल असुन सुध्दा शब्द कमी पडू लागलेत, वेळ म्हटला तर तो तसाच आहे, बारा अधीक बारा तासांची विभागणी केलेला, फक्त आपल्या जाणिवांचेच काटे जास्त फिरू लागलेत असं वाटतं!

किती सोप व सरळ होतं ना सारं तेंव्हा! बर्‍याच घटना, गोष्टी त्यांचा तात्कालीक उच्चतम व न्युनतम परिणाम होउन गेल्यानंतर कळत असत, तरीही त्यांचे विविध पडसाद तेवढयाच तिव्रतेने उमटत असंत व त्या बद्लच्या प्रतिक्रिया पण तशाच पोहचत असत, किंबहुना त्यावरील प्रतिक्रियांची पलिकडच्या बाजुला प्रतीक्षा होत असायची. आज तर सारंच इंन्स्टट झालयं, टेक्नाँलाँजी मुळे सेकंदात अनेक गोष्टी एकिकडू दुसरीकडे त्यांच्या परिणामां सकट पोहचतात, तरीही त्यातील ओलावा हरवल्यासारखा वाटतो, एक कृत्रीमता जाणवते, कदाचित टेक्नाँलाँजी मुळे प्राप्त झालेल्या एका माहितीवर आपलं मत पक्क होई पर्यंत वेगळ्याच विषयाची दुसरी माहिती प्राप्त होते, दरम्यान अगोदरची माहिती थोडी दुर्लक्षित होते व तीचा प्रभाव पडायचा राहून जातो. माहितीचा ओघ येवढा तीव्र व प्रचंड आहे कि पाच मिनिटा पुर्वी काय पाहिलं वा वाचलं हे सुध्दा लक्षात रहात नाही, आणि तशीच सवय आपण आपल्या मेंदुला पण लावतोय कि काय? असं मला वाटतं.

पुर्वी घोकंपट्टी करावी लागे, एक एका गोष्टींची कित्तेक पारायणे घडत, मनावर कोरल्या जात त्या गोष्टी, घटना ते प्रसंग लक्षात रहात, माहितीचा ओघ कमी होता म्हणुन कि काय त्याच त्याच गोष्टी चघळल्या जायच्या? पण एक कबुल करायलाच हवं ते म्हणजे घोकंपट्टीमुळे बर्‍याच बाबतीत पाया पक्का होउन जायचा.

विचार करता टेक्नाँलाँजीचा फायदा तसा खुप होतोय, पण माणुस दुरावतोय, तेच ते छापील मेसेज कट पेस्ट करून पाठवले जातात किंवा घाईगडबडी बोलणं होतं, त्याला पत्राची वा बुथवरच्या काळ्या पिवळ्या फोनवरून उच्चारलेल्या शब्दांची सर नाही येत, एक तकलादूपणा येवु लागलाय, भावनांचा मोहोर नसलेला. मेघदूताची रोमँन्टीक परंपरा असलेल्या आम्हाला सर्व सुविधा असुन कोरडेपणा का जाणवतो? कदाचीत जगण्याची रीतचं बदलत चालली आहे वाटतं आपली...!
© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t25347/new/#new

दे धक्का...! आत्मपरीक्षण?


दे धक्का...!
आत्मपरीक्षण?

हल्लीच पोलिसांच्या मागे
लोक हातधुवुन का लागले?
परीस्थितीचा विचार करा
कुणाचे, कुठे, काय चुकले?

दोहोंना आता आत्मपरीक्षण
करण्याची नक्की गरज आहे,
दोघांतील राजकिय हस्तक्षेप
खरचं टाळण्याची गरज आहे !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t25346/new/#new

बुधवार, ७ सप्टेंबर, २०१६

दे धक्का...! उपकर


दे धक्का...!
उपकर

अपघात रोखण्यासाठी आता
नविन वाहनांना उपकर लावणार,
लावणार आहात उपकर, तर
अपघातप्रवण रस्ते कोण सुधारणार?

अगोदरच सर्वांकडून रोड टँक्स
बर्‍यापैकि वसूल केला जातो,
बिओटी मधुन रस्ते तयार होतात
मग जमा झलेला कर कुठे जातो?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25313/new/#new

रविवार, ४ सप्टेंबर, २०१६

दे धक्का...! वाँट्सअँप, सं/वाद


दे धक्का...!
वाँट्सअँप, सं/वाद

अभिव्यक्ती स्वातंत्र म्हणजे
कुठेही काहिही लिहायचं,
वाँट्सअँप वापरताना मात्र
थोडसं तारतम्य पाळायचं !

वाँट्सअँपचं लिखाणं आता
भोसकण्या पर्यंत गेलं आहे,
प्रत्येकाने नक्की ठरवा आता
तुम्हाला कुठवर जायचे आहे!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t25286/new/#new

येणे जाणे येथवरचे

येणे जाणे येथवरचे

चुकलेच ना कोणा, येणे जाणे येथवरचे
आला कोण मुक्कामी, येथे आराम कराया?

जिर्णत्व जयांचे सत्य, वसनापरी ती नाती
गुंतुनी भावनेत सार्‍या, कष्टतो उगी जगाया !

जो जगतो स्वतः,  तो आपुल्याच साठी
व्यर्थ त्रासतो जीवश्च, दुसर्‍यां प्रेम दावाया!

जाणता एकदाच ते, सत्य सारे जीवनाचे
उमगतो हिशोब मग, बसलोय जो कराया !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita/t25276/new/#new

शनिवार, ३ सप्टेंबर, २०१६

दे धक्का...! "जिवो"जी भरके


दे धक्का...!
"जिवो"जी भरके

हम तो जी रहें है मजे में
अब तुम भी जीभरके "जिवो",
साठ दिवसांसाठी फुकट देतो
नंतर पैसे देवुनच वापरा "जिवो"!

"दुनिया मुठ्ठीमें" आधीच होती
केली बघा सेव्हन-जी ची तयारी,
मस्त वापरा तुम्ही आता "जिवो"
घेतो मी धंदा वाढवाया भरारी !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-''-25266/new/#new

शुक्रवार, २ सप्टेंबर, २०१६

ओझे श्वासांचे

ओझे श्वासांचे

सुटता मिठी जरा दुश्मनाची
आपलेच तेंव्हा वार करते झाले!

सुटला उसासा जरा वेदनेचा
हसण्या स्वकिय ते गोळा झाले!

झेलता झेलता प्रपात दुःखांचे
दुःखाशीच आता मज प्रेम झाले!

जगावे किती अजुनी जीवना?
अवजड ते ओझे श्वासांचे झाले!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t25257/new/#new

दे धक्का...! चँनेल बंदी


दे धक्का...!
चँनेल बंदी

भारतीय चँनल्सना घालणार
आता पाकिस्तानात बंदी,
तरी सुध्दा इथे काहि लोक
त्यां कलाकारांसाठी आनंदी!

संस्कृती अशी एकाबाजूने
कधी रूजवता येतच नाही,
कट्टरतेचा पुरस्कार करणार्‍या
देशात संस्कृती कधी रूजत नाही !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25256/new/#new

प्रवास...


गुरुवार, १ सप्टेंबर, २०१६

दे धक्का...! मुंबईचा पुळका


दे धक्का...!
मुंबईचा पुळका

भ्रष्टाचारावर ओरड करणारे
जीएसटीचं श्रेय घेवु लागले,
मुंबईच्या स्वायतत्तेचे डोहाळे
प्रत्येकाला आता लागु लागले?

सोन्याचं अंड देणारी कोंबडी
कुणी आता कशी पाळायची?
त्याच तयारीला लागलेत सारे
ठरवून मुंबई ताब्यात घ्यायची !

© शिवजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25241/new/#new