रविवार, ५ फेब्रुवारी, २०१७

आग्रह

आग्रह

देवजीस येथे लागला घोर देवळाचा
पडेल कधी हातोडा अतिक्रमणाचा

शोधतोय तो आसरा चरणी भक्तांच्या
वाढला बोलबाला पहा भोंदु बाबांचा

अपेक्षा नाही त्या उंची सुवर्ण दानाची
हवाय तो जोडलेला हात नमस्काराचा

शोध तुझ्यातच मला, दडलोय मी तेथे
आग्रह प्रेमळ पोहचविला हा देवाजीचा

© शिवाजी सांगळे
http://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita/t27162/new/#new

मोल

मोल

जीवन हल्ली अस झालं
झगमगाटावर मन आलं,
पारा असो नसो काचेला
चमचमाटाला मोल आलं!
=शिव
355/04-02-2017

मोती

मोती

काही माणसं अळवावरच्या
पाण्या सारखी असतात,
दिसतात मोत्या सारखी
घसरूनही लगेच जातात !
=शिव

शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०१७

महानता

महानता
दोन वेळा वर्षातुन देश आपला 
महान भासतो,
बाकी वर्षभर तो राजकारणाचा
आखाडा असतो !
=शिव

त्याग

त्याग
सांगणार आहे मित्रांना
नका टॅग करू पुन्हा !
"त्याग"न्याचा तूम्हास
घडेल मज कडून गुन्हा !
=शिव 

बोल

बोल
कधी कधी नुसतेच हे
शब्दांचे खेळ नसतात,
बरेचसे अनुभुतीचे अन्
प्रारब्धाचे बोल असतात !
=शिव 

स्माईली

स्माईली
"या डोळ्यांची दोन पाखरे"
गेली पहा कधीची उडून,
वाँट्सअँपची भुरळ पडली
स्माईलीच जाते सर्व सांगुन !
=शिव  

बुधवार, १ फेब्रुवारी, २०१७

वाट



वाट

का कुणास ठावूक ?
हि वाट ओळखीची वाटते,
आल्यावर मात्र इथे
तूझीच आठवण दाटते ! 01-02-2017
=शिव

मंगळवार, ३१ जानेवारी, २०१७

तळ

तळ

मनाचा तळ न सापडणारा
मारून डुबकी न दिसणारा
शोधूनही शिल्लक उरणारा
अखंड शून्यात  फिरणारा !

=शिव

सोमवार, ३० जानेवारी, २०१७

चिरतरून

चिरतरून

सुन्या वाटेला प्रतिक्षा ही कशाची?
शोध रे मना तूच तूझ्या वळणाची!

सारेच व्यर्थ आभास भोग लालसेचे
तोडण्या धजावे शृंखला परीक्रमेची!

देह जळीदार झाला पुराना आता
चिरतरून मनास आस रे कशाची?

आसमंती एक ठिपका प्रतिक्षेतला
पाहतोय वाट तेथवर पोहचण्याची!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t27120/new/#new