रविवार, १८ मार्च, २०१८

फसवू नका मित्रांना

फसवू नका मित्रांना

डकवून ते खोटे डी पी 
फसवू नका हो मित्रांना,
साहित्य असेल ढापलेले
दाखवू नकाच मित्रांना !

काव्य, लेख बरेच काही
दाखवा तो वारसा मित्रांना,
स्वलेखन सुद्धा असो कसे
कळूदेत तेही सर्व मित्रांना !

चोरी तर चोरीच असते
कळते कधी तरी मित्रांना,
आवडले न् पोस्ट केले
उल्लेखून सांगा मित्रांना !

© शिवाजी सांगळे 🎭 
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/
preranadai-kavita/t30459/new/#new

नंतर नंतर

नंतर नंतर

सोसला भार झाडाने फळांचा पिकल्या नंतर
सोडला निश्वास फांदीने फळे खुडल्या नंतर

बहाणे, हट्टाने उधळणे कधी मुक्त स्वतःला 
सारे कळले सखे तुझ्या प्रेमात पडल्या नंतर

होतोय कमी दुरावा श्वासांच्या अंतरातला
होताच भेट तुझीमाझी मिठीत शिरल्या नंतर 

पानगळ शहरात इथे होते रानात तिथे ही
हळूवार ऋतूने आपली कुस बदलल्या नंतर

मोठेपण गारव्याचे उमगते साऱ्यास हल्ली
एकाएकी उन्हाच्या या झळा वाढल्या नंतर

कोसळतात परतूनी सरी पावसाच्या येथे
देणे भरल्या मेघांचे शिल्लक फेडल्या नंतर

© शिवाजी सांगळे 🎭 
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t30449/new/#new

लळा शब्दांचा

लळा शब्दांचा

जिथे आसवांना येतो उमाळा
तिथे आठवांचा भरतो सोहळा

असता काळजी उरी जागताना
लवंडताच कसा लागतो डोळा

पोहचण्या आधी वैकुंठ नगरी
चालता वारीत दिसतो सावळा

उठाठेव कशा करू घोषणांची
दाऊन काम लोक करतो गोळा

ओळीं सोबत छापता गोड छबी
चाहत्यांचा फुकट्या भरतो मेळा

भले अशुद्ध अन् माना नियमबाह्य
लिहिताच शब्दांचा लागतो लळा

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t30443/new/#new

जखमा

जखमा

जखमा जखमाच असतात
कुणाच्या पसरलेल्या, तर
कुणाच्या खोलवर असतात !

पापुद्रा धरतात कधी, काही
घेऊन अंतर्गत भळभळ
देत वेदना वहात असतात !

सल व्रणांचे कुरवाळताना
स्वतःच्या जखमा बऱ्याचदा
पहायला सोप्या असतात !
© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९

28-02-2018

तो जळला नाही

तो जळला नाही

http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t30437/new/#new

सोपी कोडी

सोपी कोडी

नाहीच मी कुठलाही कवी 
गुण दोष माझ्यातले दावी 

टिपतो जे स्वभाव जनातले
वाटे ओळख त्यांची व्हावी 

लागले ग्रहण कसे उन्हाला 
सावली त्याच्यावर पडावी? 

फसले सारे चक्रात इथे  
घेता फेऱ्या गती तुटावी? 

जीवन खेळ हा प्रश्नोत्तरे  
सोपी कोडी कशी सुटावी

© शिवाजी सांगळे 🎭 
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t30424/new/#new