सोमवार, २ एप्रिल, २०१८

बहाव



बंद करू या?

बंद करू या?

हा म्हणतो बंद करू या !
तो म्हणतो बंद करू या !

काही न करता ऊगाच
मी म्हणतो बंद करू या !

तो सुचवी भरल्या पोटी   
खान पान बंद करू या !

हातावर ज्या पोट असे
वदतो का बंद करू या?

कमवून जरा खुप होता 
दुकान हे बंद करू या !

लिहिले मी इतके सारे
लिहावे कि बंद करू या?

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/vidamban-kavita/t30649/new/#new

उजळणी



रविवार, १ एप्रिल, २०१८

शर

शर

चुकचुकते पाल एक छताला 
वाटे जीव तो पण तहाणला 

ध्यानात मश्गुल मिटून डोळे
विरक्ती सुर बकाने लावला 

लागली लयास उम्र चुलीची 
जवानीत नुकता गॅस आला 

मान्य कलावंत तुच शब्दाचा 
अनपढही पहा लिहू लागला 

झालाय हुशार तो जरा कुठे 
शर नथीतून मारू लागला 

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t30648/new/#new

हायकू २९४ २९६

हायकू २९६
रूप ना रंग 
सर्वांना पडे भूल
एप्रिल फूल ०१-०४-२०१८

हायकू २९५
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

हायकू २९४
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

स्पर्श

स्पर्श

वाऱ्याचे असेच असते, हळूच येवून स्पर्शून जाणे,
नि:शब्द कळ्या फुलांना, स्मित देत खुलवून जाणे ! 

येणे जाणे जरी तयाचे, अस्तित्व तो ठेवून जातो,
स्मरण होता कधी कधी, रोमांचित करून जातो ! 

मौनाचा पहारा मौनात, बरेच काही बोलून जातो,
स्पर्श आणि मौन याच, भावनेने फुलून जातो ! 

खेळ असा लपाछपीचा, असाच रंगी रंगुन जातो,
सांज सकाळच्या उन्हात, अलगद मिसळून जातो ! 

सावरणे ते चांदणीला, स्वभाव गगनाचा तो,
हरवल्या तारकेला, क्षितिजा पल्याड शाधतो !

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t30646/msg71034/#msg71034

शनिवार, ३१ मार्च, २०१८

टाळतो कशाला (गझल)

टाळतो कशाला (गझल)

बोलावतो प्रथेने तू भाळतो कशाला 
देतोय मान जेव्हा तू टाळतो कशाला 

होणार पुर्ण ईच्छा आता मनातली ती
चिंता उगाच ध्यानी तू पाळतो कशाला

ना छंद तीज फूले केसात माळण्याचा 
नाही म्हणून सुद्धा तू माळतो कशाला 

गात्रे जरी तुझी रे सारी शिथील झाली 
अश्रूंस मोल मोठे तू गाळतो कशाला 

आनंद या सुखाचा नाही जरी मिळाला
बा थेंब थेंब अश्रू तू ढाळतो कशाला

कैफात भारलेला स्वार्थी इथे जमाना 
ऊगाच जीव दोस्ता तू जाळतो कशाला

© शिवाजी सांगळे 🎭 
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/()-30635/new/#new

सोहळा