बुधवार, ८ ऑगस्ट, २०१८

सोपे नाही

सोपे नाही 

कुणावर भाळणे सोपे नाही 
परिणाम टाळणे सोपे नाही 

विरहात एकट्याने प्रेमाच्या 
होऊन पोळणे सोपे नाही 

डोक्यावर येईतो सुर्य पुरा 
दुलईत लोळणे सोपे नाही 

घोटणे लाळ जमेलही नुसती 
निष्ठेस जागणे सोपे नाही 

भोगूनी मनमुराद स्वर्गसुखे 
सहज मन मारणे सोपे नाही 

घेतली शपथ इमानदारीची 
वसा तो सोडणे सोपे नाही

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९

http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t31148/new/#new

हायकू ३५१-३५३

#हायकू ३५३
नयनी स्वप्न
सौख्याचा हा शृंगार
जीवा आधार ०६-०८-२०१८

#हायकू ३५२

छायाचित्र सौजन्य: श्री मनोज बिंड

#हायकू ३५१

छायाचित्र सौजन्य: गुगल सर्च

शनिवार, २८ जुलै, २०१८

निचरा


ओघळून जाऊद्या अश्रू
निचरा होतो भावनांचा,
मिळतो नंतर  शांत वेळ
करण्या विचार मनाचा !
४९३/२६०७२०१८

शब्द सहारा

शब्द सहारा 

वारसा कुठला ना साहित्य परंपरा
शब्द म्हणाले या आमचा हात धरा

चालता सोबतीने काय कधी जरा  
होउ लागतो मग भावनांचा निचरा

करतो दाह स्वतःचा कधी कोणाचा 
तोची धगधगत्या शब्दाचा निखारा

भरकटता विचार स्वैर जेव्हा केव्हा
होतात हेच शब्द मनाला आसरा

होतो कंप भरल्या थकल्या हातांना 
शब्दच प्रेमळ आपुलकीचा सहारा 

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t31110/new/#new