रविवार, १२ ऑगस्ट, २०१८

हायकू ३५७-३५९

#हायकू ३५९
छायाचित्र सौजन्य: श्री मनोज बिंड

#हायकू ३५८
चांदण मेळा
आसमंती हा कल्ला
काजवे गोळा १२-०८-२०१८

#हायकू ३५७
उन पाऊस
आणती मज दारी
श्रावण सरी ११-०८-२०१८

शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१८

ओळख


४९६/१००८२०१८

हायकू ३५४-३५६

३५६
थेंब दवाचा
मृदेत विरघळला
सुगंधी झाला

३५५
हिरा जाहला
क्षणिक लकाकला
गळून गेला

३५४
थेंब दवाचा
किरणांत नाहला
हिरा जाहला
#शिव १०-०८-२०१८

बुधवार, ८ ऑगस्ट, २०१८

सोपे नाही

सोपे नाही 

कुणावर भाळणे सोपे नाही 
परिणाम टाळणे सोपे नाही 

विरहात एकट्याने प्रेमाच्या 
होऊन पोळणे सोपे नाही 

डोक्यावर येईतो सुर्य पुरा 
दुलईत लोळणे सोपे नाही 

घोटणे लाळ जमेलही नुसती 
निष्ठेस जागणे सोपे नाही 

भोगूनी मनमुराद स्वर्गसुखे 
सहज मन मारणे सोपे नाही 

घेतली शपथ इमानदारीची 
वसा तो सोडणे सोपे नाही

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९

http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t31148/new/#new

हायकू ३५१-३५३

#हायकू ३५३
नयनी स्वप्न
सौख्याचा हा शृंगार
जीवा आधार ०६-०८-२०१८

#हायकू ३५२

छायाचित्र सौजन्य: श्री मनोज बिंड

#हायकू ३५१

छायाचित्र सौजन्य: गुगल सर्च