शुक्रवार, १६ नोव्हेंबर, २०१८

श्रीमंती

श्रीमंती

वारसा संतांचा, अभंगाचे मळे
शब्दांमृत फळे, सकल जना !

स्पष्ट होण्या भाव, भाषेचा सहारा
शब्द त्यां फुलोरा, रचनात्मक !

शब्दांतुनी येता, भावनांचा मेळा
श्रोते होती गोळा, सुजाण सारे !

गोडवे आम्हासी, माय मराठीचे
कौतुक शब्दांचे, तिन्ही त्रिकाल !

अर्पुनी शब्दधन, रसिकाचे जाती
लाभली श्रीमंती, कुबेरा पेक्षा !

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/preranadai-kavita/t31382/new/#new

सोमवार, ५ नोव्हेंबर, २०१८

हायकू ३७५-३७७

#हायकू ३७७
उडे पतंग
फिरे मांजा फिरकी
बेभरवशी ०४-११-२०१८

#हायकू ३७६

छायाचित्र सौजन्य: श्री अनिल गंद्रे

#हायकू ३७५
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

शुक्रवार, २ नोव्हेंबर, २०१८

चिंब वाटा

चिंब वाटा

छेडछाड करतो येथे, अल्लड पाऊस खोटा,
सावर सखे गं आता, ओलावल्या कुंतल बटा !

झिडकारले जरी किती, मुडपूनी नाजूक ओठां,
कळतोय सारा दवाला, लटका तुझा राग खोटा !

स्पर्शुनी तव ओष्ठकडा, करूनी तो आटापिटा,
विसावले दवथेंब वसनी, उमटवून अनेक छटा !

भिजल्या अंधार दिशा, झाकोळल्या सर्व वाटा,
द्वाड वारा हळूच उचले, छेडण्या आपुला वाटा !

नाजूक काया तशी ही, दर्शवीत रोमांच काटा,
धुक्यात चिरून जातो, तिरपा गं कटाक्ष छोटा !

पावसात या असल्या, झाल्या चिंब रान वाटा,
एकवटल्या कैक मनी, आठवणींच्याच लाटा !

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t31357/new/#new

नातं

नातं🌿

बळीचं आणि निसर्गाचं
नातं आहेच फार वेगळं,
एक भजतो जिवापाड
दूसरा लूटतो कधी सगळं !
५१०/३११०२०१८