शनिवार, ११ मे, २०१९

वारा


११०५२०१९

एकांत माझा


११०५२०१९

गंधीत दिवस


५४४/११०५२०१९

प्रेमरंग

हसणे आणिक रूसणे
स्वभाव आहे चंद्राचा,
म्हणूनच चढत असतो
रंग परस्परांत प्रेमाचा !
५४३/१००५२०१९

मंगळवार, ७ मे, २०१९

आरसा

आरसा

लावला भिंतीवरी कसा तरी आरसा
चेहरा न्याहाळता दिसेच ना फारसा

भास झाले कैक वेगळे कुणाला कसे
भेटलो माझा मला उगाच मी औरसा

जेवढा डोकावलो मनात शोधायला 
चेहरे माझेच भिन्न, हो कसा भरवसा?

सांगण्या दावा अनेक वाद झाले असे
सोडला मी शेवटी स्वतःच तो वारसा

सारले बाजूस ठरवुनी मला पोरका
काढला काटा असा समजूनी गैरसा

© शिवाजी सांगळे 🎭
मो. ९५४५९७६५८९ 
http://marathikavita.co.in/marathi-song-lyrics/t31662/new/#new