बदललेली कविता
कशी होती कविता
कशी झाली कविता
स्वप्नाळू होती ती
प्रेमळ होती ती
हळवी होती ती
प्रखर होती ती...
पुर्वी बरीच गोड होती
मनाला खरी ओढ होती
काळाच्या ओघामधे
नेट वर आली
आधीची बोलकी
अबोल झाली
काळ बदलला
ती ही बदलली
वैश्वीकरणात या
स्वतः हरवली...
कशी बदलून गेली कविता?
© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
२६०५२०१९