सोमवार, २७ मे, २०१९
नवे मार्ग
डोळे सुद्धा कधी तरी
फितुरी करू लागतात,
सावरण्या स्वतःला मग
नवे मार्ग शोधावे लागतात !!
#चारोळी ५५०/२६०५२०१९
~शिव
बदललेली कविता
बदललेली कविता
कशी होती कविता
कशी झाली कविता
स्वप्नाळू होती ती
प्रेमळ होती ती
हळवी होती ती
प्रखर होती ती...
पुर्वी बरीच गोड होती
मनाला खरी ओढ होती
काळाच्या ओघामधे
नेट वर आली
आधीची बोलकी
अबोल झाली
काळ बदलला
ती ही बदलली
वैश्वीकरणात या
स्वतः हरवली...
कशी बदलून गेली कविता?
© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
२६०५२०१९
कशी होती कविता
कशी झाली कविता
स्वप्नाळू होती ती
प्रेमळ होती ती
हळवी होती ती
प्रखर होती ती...
पुर्वी बरीच गोड होती
मनाला खरी ओढ होती
काळाच्या ओघामधे
नेट वर आली
आधीची बोलकी
अबोल झाली
काळ बदलला
ती ही बदलली
वैश्वीकरणात या
स्वतः हरवली...
कशी बदलून गेली कविता?
© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
२६०५२०१९
कवीचे मन
शुक्रवार, २४ मे, २०१९
संपले शब्द
चाराक्षरी
चाराक्षरी
कशी व्यथा
म्हण कथा
येता जाता
प्रेम गाथा
वाटा तुझा
वाटा माझा
सुख कधी
नसे बोजा
खरा जीव
प्रेम भाव
ओढच ती
नसे आव
© शिवाजी सांगळे 🎭
24-05-2019 YQ
कशी व्यथा
म्हण कथा
येता जाता
प्रेम गाथा
वाटा तुझा
वाटा माझा
सुख कधी
नसे बोजा
खरा जीव
प्रेम भाव
ओढच ती
नसे आव
© शिवाजी सांगळे 🎭
24-05-2019 YQ
गुरुवार, २३ मे, २०१९
हायकू ४२६-४२८
बुधवार, २२ मे, २०१९
सापडेना एकांत
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)