बुधवार, १७ जुलै, २०१९

मंगळवार, १६ जुलै, २०१९

गुरु


१६०७२०१९

हायकू ४३५-४३७

#हायकू_४३७
गुरु पौर्णिमा
मान गुरू जणांचा
भाव शिष्याचा १६-०७-२०१९

#हायकू_४३६
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू_४३५
तुषार खेळ
नाजूक हळूवार
अंगी शहारे २८-०६-२०१९ 

रविवार, १४ जुलै, २०१९

प्रेम भाषा


४१/१४०७२०१९

वाव आहे


१४०७२०१९

हेतू

हेतू

टाळणे सोपे मला विसरणे कठीण आहे
सांगू कसा पुरताच हेतू तुझा क्षीण आहे

रात्रं दिवस येथल्या शेतात राबतो बळी 
बिनधास्त दलालांची शहरात चैन आहे

कसले उपाय अन् योजना त्या कशाला
तोऱ्यातली सत्ता मिचकावित नैन आहे

मंद प्रकाशी दालनातल्या टेबलावरती
कर्जमाफी कागदावर नाचरा पेन आहे

भाव खातोय वाऱ्यावरी झुलता मनोरा 
घेऊन माल नशेचा सार्वत्रिक मौन आहे

मी कोण येथला आभारास पात्र येवढा
दरबारात सरस्वतीच्या मात्र लीन आहे

© शिवाजी सांगळे 🦋
 संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/gambhir-kavita/t31887/new/#new

याद आती रही


१३०७२०१९