शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१९

कैसे कहें?


६३/०६०९२०१९

रान सोहळा

रान सोहळा

विभ्रम कवडशांचे भुलावे जणू नभाचे
वाऱ्यावर स्वैर खेळती तरंग ते जळाचे

लखलख सोहळा चौफेर हिरव्या रानी
तुषार दवांची चमके दौलत पानोपानी

अमृत थेंब झरती रान फुलांच्या ओठी
वाऱ्यासंगे डोलत भ्रमर तयांच्या पाठी

अलगद विरते फुंकर वेळूच्या स्वरांची
शिरशिरी सजवी मैफिल तृणपात्यांची

पिऊन फुलगंध भोवती नशीला वारा   
गंध सुगंधी झाला धुंद आसमंत सारा

https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t31996/new/#new

© शिवाजी सांगळे 🦋
 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

वेळ


०६०९२०१९