रविवार, ३१ जुलै, २०१६

दे धक्का...! मनोरा वय वर्षे २०


दे धक्का...!
मनोरा वय वर्षे २०

अनधिकृत बांधकामे
आता अधिकृत करणार,
विस वर्षेच जुना "मनोरा"
पाडून पुन्हा बांधणार !

लोकांच्या पैश्यावर मात्र
राजकारणी निवास करणार,
निकृष्ट कामा बद्ल, कोण
कोणाला जाब विचारणार?

© शिवाजी सांगळे🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-''-24816/new/#new

शनिवार, ३० जुलै, २०१६

का रे, तू असा?

का रे, तू असा?

का रे पावसा तू असा?
आल्यावर कहर करतोस!
बरसु लागलास तर,
बेधुंद कसा काय बरसतोस?

आम्ही असतो घाईत
जरा दमान घेत जा,
सकाळ, संध्याकाळची
वेळ टाळून येत जा!

ठरल्या वेळी असते
आम्हा पकडायची गाडी
नेमकी तेव्हाच काढतोस
का तू आमची खोडी ?

हो, अचानक येतोस
धांदल उडवुन देतोस,
कामावर जाते वेळी
चक्क भिजवून जातोस!

माहीत आहे, तुझी ड्यूटी
असते फक्त चार महिने,
तरीही पहात असतो
वाट तूझी आठ महिने !

तूच जीवन, तूच सर्व
नातचं असं तूझ्याशी,
सांभाळायला पर्यावरण
पाणीदार बुद्धी दे जराशी!

© शिवाजी सांगळे🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t24811/new/#new

दे धक्का...! कोटींचा तोटा


दे धक्का...!
कोटींचा तोटा

प्रभु म्हणे मुंबई लोकलला
तीन हजार कोटींचा तोटा,
जादा महसुल देत असता
किती खरा किती खोटा ?

"अनुदानित भाडे रचना हे
यामागचे प्रमुख कारण आहे",
अप्रत्यक्ष पणे चाकरमान्यांनो
हि भाडे वाढीची सुचना आहे !

© शिवाजी सांगळे🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24808/new/#new

शुक्रवार, २९ जुलै, २०१६

दे धक्का...! अर हर महागाई


दे धक्का...!
अर हर महागाई

हल्ली महागाईच्या मुद्यावर
दोन्ही कडे गोंधळ आहे,
लोकसभेत डाळ, टोमँटो
इकडे पण तीच चर्चा आहे !

विरोधक विचारतात प्रश्न
यांच्या कडे उत्तरच नाही,
जे काही बोलतात त्याला
महागाईचा संदर्भच नाही !

© शिवाजी सांगळे🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-'-'-24799/new/#new

गुरुवार, २८ जुलै, २०१६

दे धक्का...! काम ज्याचं त्याचं


दे धक्का...!
काम ज्याचं त्याचं

मुंबईसह सर्व पालिका क्षेत्रात
खड्यांचा बाजार भरला आहे,
कमी अधिक प्रमाणात, कुणी
बुजविण्याचं काम करीत आहे!

खड्डे बुजविण्याचं महत्वाचं काम
ज्याचं त्यांनी वेळेत करायला हवं,
वाहतुक सांभाळता सांभाळता
उगीच पोलिसांनी ते का करावं?

© शिवाजी सांगळे🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24778/new/#new

बुधवार, २७ जुलै, २०१६

नातं पल्याडचं

नातं पल्याडचं

मैत्रीच्या पल्याड
एक नातं असतं !

नसता पाणी कधी
शब्दांनी चिंब करतं !

पेटवायचं नसलं तरी
स्पर्शानं केवळ चेतवतं !

मनातले भाव सुध्दा
डोळ्यांतुनच बोलतं !

दुराव्याचं असलं जरी
आपुलकीचचं असतं !

जीवंतपणी जुळलेलं
अनंतात विरणार असतं!

© शिवाजी सांगळे 🎭

दे धक्का...! कट्टी बट्टी


दे धक्का...!
कट्टी बट्टी

दोघ आम्ही तसेच हट्टी
कधी कट्टी तर कधी बट्टी,
भांडत जरी कधी असलो
तरीही आहे आमची गट्टी !

राजकारण रूपी संसारात
या कुरबुरीना वाव असतो,
जनता नामक शेजार्‍यांचा
टाईमपासही होत असतो !

© शिवाजी सांगळे🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24767/new/#new

पाऊस पाखरू


पाऊस पाखरू

लाेलक थेंब पाऊस बिलोरी
एकसुर बरसती अखंड धारा,
तांबुस हिरव्या रंगा सोबती
पाखरां हाेई तो वृक्ष सहारा !

© शिव 🎭

मंगळवार, २६ जुलै, २०१६

दे धक्का...! याड लागलं

दे धक्का...!
याड लागलं

ज्याला बघावं तो हल्ली
पाेकेमाँनला शोधतो आहे,
याडा मुळं प्रत्येक जण
जीवावर उदार होत आहे!

येवढं हे याड तूम्ही
अभ्यास न् कामाला लावा,
रिजल्ट बघा मिळेल
तूम्हाला पाहिजे तो हवा?

© शिवाजी सांगळे🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24759/new/#new

शनिवार, २३ जुलै, २०१६

जलसा

जलसा

पाऊस पडून गेल्यावर
रानात आज जलसा होता,
रातकिड्याच्या गाण्या संगे
काजव्यांचा नाच होता !

© शिव 🎭