शनिवार, ३१ मार्च, २०१८

टाळतो कशाला (गझल)

टाळतो कशाला (गझल)

बोलावतो प्रथेने तू भाळतो कशाला 
देतोय मान जेव्हा तू टाळतो कशाला 

होणार पुर्ण ईच्छा आता मनातली ती
चिंता उगाच ध्यानी तू पाळतो कशाला

ना छंद तीज फूले केसात माळण्याचा 
नाही म्हणून सुद्धा तू माळतो कशाला 

गात्रे जरी तुझी रे सारी शिथील झाली 
अश्रूंस मोल मोठे तू गाळतो कशाला 

आनंद या सुखाचा नाही जरी मिळाला
बा थेंब थेंब अश्रू तू ढाळतो कशाला

कैफात भारलेला स्वार्थी इथे जमाना 
ऊगाच जीव दोस्ता तू जाळतो कशाला

© शिवाजी सांगळे 🎭 
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/()-30635/new/#new

सोहळा



सोमवार, २६ मार्च, २०१८

हायकू २९१-२९३

#हायकू २९३

छायाचित्र सौजन्य: गुगल

#हायकू २९२

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू २९१
चमके विज
गहिवर नभाला
पाऊस आला २३-०३-२०१८

लिहूया म्हणतो

लिहूया म्हणतो 

दु:खाला आता जरा वेठीस धरूया म्हणतो
एखादी कविता दु:खावरती लिहूया म्हणतो

धुंडाळली अनेक गावे सुखाची काल परवा
उरली भेट दु:खाच्या गावा देवूया म्हणतो

आनंदाची, सुखाची गायलीत अनेक गीते
शेवटी सुर एक दु:खाचा आळवूया म्हणतो

स्मृती येथे चिरंतन प्रेमाच्या बांधल्या कुणी 
स्मारके अज्ञात शहीदांची स्मरूया म्हणतो

वाजत गाजत येताच वरात दु:खाची दारी
अंतिम यात्रा सुखाची डोळी पाहूया म्हणतो

© शिवाजी सांगळे 🎭 
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t30580/msg70924/#msg70924

रविवार, २५ मार्च, २०१८

गुरुवार, २२ मार्च, २०१८

हायकू २८८-२९०

#हायकू २९०
बेभान वारा
लाटांचा खेळ सारा
हसे किनारा २२-०३-२०१८

#हायकू २८९
वाऱ्याचे गाणे
दरवळे केवडा
फुलांचा सडा २२-०३-२०१८

#हायकू २८८
तापले उन
वाऱ्याअंगी आळस
लाल पळस २२-०३-२०१८

बुधवार, २१ मार्च, २०१८

काही शब्द

....

काही शब्द
दूर दूर जाणाऱ्या
सावली सारखे...
काही... गुढ शांत
सायंकाळी वेढणाऱ्या
सावली सारखे...
मनावर गारूड करणारे
कधी गारूडी होणारे..
बिथरलेल्या मनाला
सहज डोलावणारे...
मीरेच्या विराणीतून स्त्रवणारे 
बासरीतून पाझरणारे
माऊलींच्या ओवीतील 
तेवणाऱ्या वातीतले,
तुकोबांच्या...
कठोर, मृदु वाणीतले...
असंख्यांचे... असंख्यांना
मोहित करणारे... 
शब्द
कवितेतून झरलेले

©शिवाजी सांगळे
२१-०३-२०१८

मंगळवार, २० मार्च, २०१८

हायकू २८५-२८७

#हायकू २८७
कोवळे पान
तांबूस मखमली
बाळसेदार २०-०३-२०१८

#हायकू २८६
ऋतू वसंत
प्रसवली पालवी
हिरवीगार १९-०३-२०१८

#हायकू २८५
पाण्यास स्पर्श
गोऱ्यापान पायाचा 
कंप पाण्याचा १७-०३-२०१८
©शिव